Breaking News

जय किसान गणेश मंडळाच्या आरोग्य शिबीरात एक हजारवर पशुधनावर उपचार


दिनेश कापसे । किल्ले धारूर
      
येथील जय किसान गणेश मंडळाच्या वतीने पशुचिकित्सा शिबीराचे आयोजन येथील दसरा मैदानात आज सकाळी करण्यात आले होते. यावेळी एक हजारावर पशूंची तपासणी करुन त्यांच्यावर  उपचार करण्यात आले. जय किसान मंडळाने राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात होते. 
जय किसान गणेश मंडळाच्या वतीने दर वर्षी प्रमाणे यंदा ही विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा मानला जातो. त्याला शेतात सहकार्य करणारे पशुधन हा त्याचा खरा मित्र मानला जातो. त्यामुळेच शेतकऱ्याच्या हितासाठी मंगळवारी पशुधन आरोग्य शिबिर मंडळाच्या वतीने आज सकाळी ७  ते १२  यावेळेत आयोजित करण्यात आले होते. या शबीरात परिसरातील शेतकऱ्यांनी पशुधनाची तपासणी करण्यासाठी गाय, बैल, शेळ्या म्हशी आणल्या होत्या. जनावरांना जंतूनाशक लस, गोमाशा निर्मूलन लसीकरण,  घटसर्प,  शेळ्यांसाठी पीपीआर खच्चीकरण, वंधत्व तपासणी, गर्भ तपासणी शस्त्रक्रिया इत्यादी तपासण्या सुमारे एक हजार १८ जनावरांची तपासणी  करण्यात आली. यावेळी धारुर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कोळी यांच्यासह डॉ. राधे जगताप, नकाते, लगस्कर, वायकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. 

No comments