Breaking News

केजमध्ये आज अँटीजेन टेस्टमध्ये आढळले १७ पॉझिटिव्ह : ३ केंद्रावर ७४६ झाल्या टेस्ट


गौतम बचुटे । केज
केज तालुक्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशा नुसार केज येथील व्यापारी वर्गाच्या अँटीजेन टेस्ट घेण्यात येत आहेत. या सर्व तपासण्या तीन केंद्र आणि एक फिरते पथक यांच्या माध्यमातून घेण्यात आल्या. दुपार पर्यंत सुमारे ७४६ तपासण्या पूर्ण झाल्या.
असून त्यात  १७ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. त्यांना उपचारासाठी केज येथील कोरोना उपचार केंद्रात हलविण्यात आले आहे.

केज येथे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशा नुसार वाढता संसर्ग रोखण्यासाठी लोकांशी संपर्कात येणारे विविध प्रकारच्या सेवा सुविधा पुरविणारे व्यापारी आणि दुकानदार हे लोकांच्या जास्त संपर्कात येतात. त्यांच्या कडून जास्त कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहेत. दुसऱ्या दिवशी केज येथील सररस्वती विद्यालय, वसंत महाविद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि एक फिरते पथक यांच्या मार्फत या तपासण्या सुरू आहेत. दरम्यान आज ७४६ व्यापाऱ्यांच्या तपासण्या पूर्ण झाल्या. त्यापैकी १७ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. त्या  संशयित १७ जणांना उपचारासाठी केज येथील कोरोना उपचार केंद्र पिसेगाव येथे हलविण्यात आले आहे.

केज येथे व्यापारी वर्गातील मेडील स्टोअर्स, किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते, मशिनरी स्टोअर्स, स्टेशनरी दुकान, कृषी सेवा केंद्र अशा एकूण ६२९ जणांच्या नोंदी करण्यात आल्या होत्या. आज केज येथील या चार केंद्रावर एकूण ७४६ जणांच्या तपासण्या पूर्ण झाल्या त्यापैकी १७ चे अहवाल हे पॉजिटीव्ह आल्याची विश्वासनिय माहिती आहे.

या अँटिजेंन टेस्ट घेण्याच्या कामी नायब तहसीलदार सचिन देशपांडे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले, मुख्याधिकारी विशाल भोसले, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे यांचे सर्व यंत्रणेवर नियंत्रण आहे. तसेच डॉ. विजय मोराळे, डॉ. राहुल परोडे, डॉ. आशिष मुळे आणि त्यांचे सहकारी यांनी अँटिजेंन टेस्ट घेतल्या.

No comments