Breaking News

लहान मुलीला ताब्यात देण्या वरून कुऱ्हाडीने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न : अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे

गौतम बचुटे ।  केज 
लहान मुलीचा ताबा देण्यावरून केज तालुक्यात एकास कुऱ्हाडीने मारहाण करून करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, पाच वर्षांपूर्वी केज तालुक्यातील टाकळी येथे सविता गोविंद घुले हिचा नवरा गोविंद घुले याने आत्महत्या केलेली आहे. त्यांना लहान पाच वर्ष वयाची मुलगी आहे. नवरा वारल्यापासून सविता ही तिच्या माहेरी चिखलबीड येथे राहत असून तिची मुलगी श्रावणी गोविंद घुले वय ५ वर्षे ही टाकळी ता केज येथे आजी-आजोबांकडे राहात आहे.

दरम्यान दि.२२ ऑगस्ट रोजी चिखलबीड येथील सोमीनाथ आण्णा तोगे, नंदुबाई सोमिनाथ तोगे, सविता गोविंद धुले, हनुमंत सोमिनाथ तोगे, बाळु आण्णा तोगे, सुरेखा बाळु तोगे, अविनाश बाळु तोगे, सुदामती नारायण तोगे, नारायण आश्रुबा तोगे, गणेश भारत डोरले आणि बाळु लक्ष्मण डोरले सर्वजण बोलेरो जीपने (क्र. एमएच-१४ /इएफ-२५६०) ने सुमारे ११:०० वाजण्याच्या सुमारास केज तालुक्यात टाकळी येथे आले. ते सर्वजण घुले यांच्या घरा समोर गेले आणि सोमीनाथ अण्णा तोगे हा सुंदरराव घुले यांना म्हणाला की, त्याची नात श्रावणी हिला घेऊन जाण्यासाठी आलेे आहोत. तिला घेऊन जाणार असे म्हणाला. त्या वेळी सुंदरराव घुले म्हणाले की, श्रावणी आमच्याकडेच राहणार असे ठरलेले आहे. तेव्हा आरोपी सोमिनाथ तोगे यांनी सुंदरराव घुले यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने हातातील कुऱ्हाड त्यांच्या  डाव्या डोळ्याच्या वर कपाळावर मारून जखमी केले. तसेच सुदरराव यांची पत्नी मुलगा व सून यांनाही दगड विटांनी मारहाण करून जखमी केले आहे.

सुंदरराव घुले यांनी दि.२५ ऑगस्ट रोजी केज पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी नुसार चिखलबीड येथील अकरा जणांच्या विरोधात केज पोलीस स्टेशनला गु.र.नं. ३२३/२०२० भा.दं.वि. ३०७, ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८ आणि१४९  नुसार गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. अधीक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे करीत आहेत.

No comments