Breaking News

...आता तहसील कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी बोंब मारो आंदोलन !

शेकाप-शिवसंग्राम-रिपाइंचे बोंब मारो आंदोलन करणार !
गौतम बचुटे । केज : 
केज तहसील कार्यालयातील दीर्घ मुदतीतीचे आणि स्थानिक कर्मचारी यांची केज येथून बदली करण्याची तक्रारवजा मागणी करूनही बदल्या झाल्या नसल्यामुळे शेकाप-शिवसंग्राम-रिपाइं (ए) च्या वतीने तहसील कार्यालया समोर बोंब मारो आंदोलन करण्यात येणार आहे.

बीड अनेक महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदलाचे आदेश निघाले आहेत. मात्र केज तालुक्यातील काही स्थानिक कर्मचारीचे नागरिकांना त्रास देत असून त्यांच्यामुळे भ्रष्टाचार सुरूअसल्याची तक्रार करूनही त्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. त्या बद्दल शेकाप-शिवसंग्राम आणि रिपाइं या पक्षांच्या वतीने भाई मोहन गुंड, बाळासाहेब गलांडे आणि दीपक कांबळे यांनी तहसीलदार यांना बोंब मारो आंदोलनाच्या संदर्भात निवेदन दिले आहे.

निवेदनात जिल्ह्यात नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, कारकून यांच्या बदल्या झाल्या असताना केज तहसील अंतर्गत नायब तहसीलदारासह तलाठी मंडळ अधिकारी यांच्या बदल्या होणे अपेक्षित असताना जिल्हा अधिकारी साहेब यांनी १५ ते २० वर्ष केज येथेच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या मात्र जैसे थे !ठेवल्या आहेत. यात नेमकं कुठलं कारण आहे ? स्थानिक लोक तालुक्या बाहेर जाण्यास तयार नाहीत. भ्रष्टाचाराची पाळे-मुळे यात ठिकाणी दिसून येत आहेत. असा उल्लेख निवेदनात केला आहे.

जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन देखील बदल्या होत नाहीत. वाळूचे पुरवठा विभागाचे अनेक तक्रारी दिलेल्या असताना; अशा मुजोर आधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. वादग्रस्त असणारे राजकीय हितसंबंध जोपासणारे अधिकारी केज मध्ये नको आहेत. त्यामुळे सामान्य लोकांना त्रास होतो. अशा लोकांच्या तात्काळ बदल्या कराव्यात. या मागणीसाठी २४ ऑगस्ट रोजी केज तहसिल कार्यालया समोर शेतकरी कामगार पक्ष-शिवसंग्राम-रिपाइं (ए) या तीन पक्षाच्या वतीने बोंब मारो आंदोलन करण्यात येणार असल्याचे पत्र केज तहसीलदार यांना दिले आहे. नियोजित बोंब मारो आंदोलनाच्या निवेदनावर भाई मोहन गुंड, बाळासाहेब गलांडे दिपक आणि कांबळे यांनी दिले आहे.

No comments