Breaking News

अर्सेनिक अल्बम-३० होमिओपॅथिक तज्ञांच्या सल्ल्यानुसारच घ्यावं

अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त डोईफोडे यांनी केलं आवाहन
बीड :  कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात मोठ्या प्रमाणावर मनुष्य हानी झालेली असून लोक बाधित झालेले आहेत. अर्सेनिक अल्बम-३० या होमिओपॅथिक औषधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते म्हणून मोठ्या प्रमाणात लोक हे औषध मेडिकल स्टोअर्स मधून घेऊन सेवन करत आहेत.
प्रत्यक्षात या औषधामुळे कोरोना बरा होत नसून त्याचा उपयोग रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होतो. तथापि लोक स्वयंप्रेरणेने ही औषधे घेत असून होमिओपॅथिक तज्ञ यांचा सल्ला घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे.सदर औषध जनतेने होमिओपॅथिक तज्ञ यांच्या सल्ल्यानुसारच घ्यावी कारण रुग्णाच्या आजारानुसार औषधाचा डोस व कालावधी, पाळायची पथ्य, इत्यादी हे तज्ञच ठरवू शकतात व औषधांचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार न केल्यामुळे प्रसंगी त्याचाआरोग्यावर विपरीत परिणाम देखील होऊ शकतो. असे आवाहन सहायक आयुक्त(औषधे) अन्न व औषध प्रशासन ,बीड रा.बा. डोईफोडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे  केली आहे.No comments