Breaking News

स्वॅब तपासणीस टाळाटाळ केल्यास होणार गुन्हा दाखल

कोरोना बाधित रुग्णांच्या सहवासितांनी स्वॅब तपासणीसाठी प्रशासनास सहकार्य करावे--मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार

बीड : कोरोना बाधित रुग्णांच्या सहवासितांनी  तपासणीस टाळाटाळ अथवा नकार दिल्यास संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन कायदया नुसार कायदेशीर कार्यवाही करुन गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांच्या सहवासित (High Risk & Low Risk) यांनी कोणत्याही कारणास्तव स्वॅब देण्यास टाळाटाळ करु नये, दिलेल्या वेळेत स्वॅब देण्यास हजर राहुन प्रशासनास सहकार्य करावे  असे आवाहन अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांनी केले आहे.
जिल्हयात कोविड -१९ चा प्रादुर्भाव वाढत असुन प्रशासनामार्फत प्रसार थांबविण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणजे कोरोना संसर्ग बाधित रुग्णांच्या सहवासितांचा (High Risk & Low Risk) शोध घेऊन विलगीलकरण करणे व आवश्यकतेनुसार कोविड -१९ ची चाचणी करणे हा आहे. 

कोविड -१९ चा बाधित रुग्णांची विचारपुस व चौकशी करुन त्या आधारे  सहवासीतांची यादी बनवुन अति जोखमीच्या (HighRisk) सहवासीत व्यक्तीची स्वॅब तपासणी करण्यासाठी त्यांना आरोग्य यंत्रणे मार्फत संपर्क केला जातो. 

कोविड -१९ चा प्रसाराची साखळी तोडायची असेल तर हे अत्यावश्यक असून प्रशासनास असे निदर्शनास आले आहे अति जोखमींच्या व्यक्तींना संपर्क करुन कोविड केअर सेंटर येथे स्वॅब तपासणीसाठी वेळ व दिनांक निश्चित केला जातो. परंतु संबंधित व्यक्ती विविध कारणे देवुन कोविड -१९ चाचणीत अडथळा आणतात. किंवा भ्रमणध्वनी बंद करुन ठेवतात. कर्मचाऱ्यांशी उध्दटपणे व अर्वाच्च भाषेत सुध्दा बोलतात तसेच प्रशासनाची दिशाभुल करुन स्वॅब तपासण्यात टाळाटाळ करतात. यामुळे सदर आवाहना द्वारे सूचित करण्यात आले आहे. 

No comments