Breaking News

व्यापारी महासंघाच्या केज बंदच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसादगौतम बचुटे | केज   
शहर व परिसरात कोरोना विषाणूचा फैलाव वाढू लागला आहे. रुग्ण संख्या प्रचंड वेगाने वाढू लागलीय याला प्रतिबंध घालून प्रसार थांबविण्यासाठी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केज येथील व्यापारी संघाने आपले सर्व व्यवहार ५ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट प्रयत्न बंद ठेवण्याच्या आवाहनाला केज येथील व्यापाऱ्यांनी सर्व स्तरातून प्रतिसाद मिळाला आहे. आज बंदचा पहिला दिवस असून आज फक्त अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार कडकडीत बंद आहेत. 

केज शहर व तालुक्यात मागील आठवड्या पासून कोरोना विषाणूचा फैलाव व रुग्ण संख्या प्रचंड वेगाने वाढू लागली. शहरात एका नागरिकांच्या रुपाने पहिला कोरोना बळी गेला आहे. अशा वेळी काळजी घेणे गरजेचे आहे. सद्याची गंभीर परिस्थिती पाहता हा उद्रेक किमान थांबवण्यासाठी व त्याची साखळी तोडण्यासाठी केज शहरातील व्यापाऱ्याची ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:०० वाजता व्यापारी महासंघाचे तालुका अध्यक्ष महादेवराव सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व इतर व्यवसाय विभाग अध्यक्ष यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन शनिवार दि. ८ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट या काळात केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवा व शासकीय सेवा वगळता किराणा, भाजी-फळविक्रेते यांच्यासह सर्व बाजारपेठ पाच दिवस कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन केले होते. त्या नुसार आज स्वयंस्फूर्तीने बंदचा पहिला दिवस असून आज सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच नगर पंचायतच्या वतीने शहरात जंतूनाशकाची फवारणी करण्यात आली.

No comments