Breaking News

वडवणी तालुक्यातील चिंचवण नगरीच्या हेमाडपंती मंदिराकडे पुरातत्व विभागाची डोळेझाक..!


पूर्वी मंदिर बारव व त्याचबरोबर विविध प्रकारच्या मंदिराचा जीर्णोद्धार हा चिरेबंदी बांधकामाने बांधलेली असायची त्याच्या अनुषंगाने पुरातन काळातील मंदिर हे अतिशय खूप मोठ्या दगडाने व रेखीव असलेल्या दगडाने बांधलेले आहेत. हा पुरातन ठेवा कायम ठेवण्यासाठी मात्र या हेमाडपंथी मंदिर पुरातत्व विभागाकडून दुर्लक्षित झालेले आहे. परंतु याकडं पुरातत्व विभागाने तात्काळ लक्ष देऊन हा पुरातन वारसा जतन करणे गरजेचे आहे.  
पुरातन काळापासूनच हेमाडपंती मंदिर आहे बांधलेले आहेत परंतु आज मितिला पाहिलं तर त्या मंदिराकडे मनावर त्याप्रमाणात पाहिले जात नाही अशाच एक बीड जिल्ह्यामध्ये वडवणी तालुक्यात चिंचवण या गावांमध्ये  इतिहास कालीन अतिशय पुरातन कालीन हेमाडपंती मंदिर आहे बांधले आहेत परंतु आज पाहिलं तर पुरातत्व विभागाकडून या मंदिराला जतन करण्याकडे कुठल्याही प्रकारचे प्रयत्न केले जात नाहीत वेळोवेळी हे मंदिर पडझडीला आलेले आहेत परंतु याकडे मात्र पुरातत्व विभाग मात्र कानाडोळा करताना दिसत आहे चिंचवण नगरीमध्ये इतिहास कालीन पुरातन कालीन व हेमाडपंती विठ्ठल रुक्मिणी महादेवाचे मंदिर त्याचबरोबर मंकावती हे देखील मंदिर आहे या मंदिराकडे मात्र पुरातत्त्व विभाग मात्र कुठल्याही प्रकारचे लक्ष देताना पाहिले नाही त्याचबरोबर गेल्या 60 ते 70 वर्षापासून या मंदिराचा डागडुजीचा कार्यक्रम हे समस्त ग्रामस्थ हे मिळून करत आहेत परंतु शासन प्रशासन आणि पुरातत्व विभाग याकडे मात्र कानाडोळा करताना दिसत आहे आपण पाहिलं तर बीड जिल्ह्याला खूप मोठ्या प्रमाणात पुरातन ठेवा लाभलेला आहे पुरातन मंदिरही लाभलेला आहेत परंतु बऱ्याच ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार झाला परंतु चीन सारख्या या गावातील मंदिरांना मात्र शासनाकडून कुठल्याही प्रकारचे डागडुजी करण्यासाठी मदत मिळताना पाहिले नाही त्याचबरोबर याठिकाणी मकरध्वज देशातील दोन ठिकाणी असलेले मंदिर आहे या मंदिराला देखील तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी शासन-प्रशासन आकडे वेळोवेळी मागणी केलेले आहे परंतु या मागणीला जाणून-बुजून फाटा दिला जात आहे त्यामुळे आगामी काळात जर का या मंदिरांना चांगल्याप्रकारे रंगरंगोटी केली नाही तर पावसाच्या पाण्यामुळे यामध्ये मंदिरांचा इतिहासकालीन व पुरातन  हेमाडपंती ठेवा असलेला नामशेष होण्याचा मार्गदेखील आहे त्यामुळे मकरध्वज मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर महादेवाचे मंदिर या मंदिरांना पुरातत्व विभागाकडून अत्यावश्यक असलेला निधी मिळाला तर या मंदिरांना चांगले प्रकारचे जीवदान मिळेल आणि एक पुरातन कालीन ठेवा असलेला तो जपण्यास पुरातत्व विभाग  लक्ष घालेल का आता प्रश्न चिंचवण ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे विठ्ठल रुक्मिणी व महादेवाच्या मंदिर हे अतिशय पुरातन व  हेमाडपंती शिवकालीन असून या मंदिराला खूप मोठ्या प्रमाणात आता पडझड झाली असून येथेच कालीन मंदिराकडे आता पुरातत्व विभागाने लक्ष घालण्याची मागणी चिंचवण ग्रामस्थांच्या माध्यमातून होत आहे या पुरातन व हेमाडपंती मंदिरातून अतिशय खूप मोठ्या प्रमाणात भुयारी मार्ग देखील आहे हा भुयारी मार्ग धारुर चा किल्ला मार्गस्थ करून आंबेजोगाई येथील  हाती खाण्यामध्ये निघत आहे पूर्वी लोक हे त्याच मार्गाने धारूर आंबेजोगाई असा  भुयारी मार्गाने प्रवास करायचे याठिकाणी कुंडलिका नदीमध्ये रामठव त्याची ठिकाणी प्रभू राम जात असताना त्यांनी या ठिकाणी आंघोळ केली त्या गावाचे नाव रामठव असे पडले असे लोक सांगतात चिंचवण नगरीचे नाव हे पूर्वी मंकावती नगरी असे होते परंतु कालांतराने चिंचवण असे झाले या ठिकाणी असलेले शिवकालीन शिवमंदिर हे अप्रतिम नक्षीकाम असलेले मंदिर आहे या मंदिराचा जीर्णोद्धार हा पुरातन लोकांनी केला असेल म्हटले जाते या मंदिराचे काम हे सर्व दगडाच्या नक्षी काम केलेले आहे या मंदिराच्या प्रत्येक दगडावर हे पुरातनकालीन चित्रदेखील रेखाटलेले घडलेली आहेत.

 हे मंदिर हे अतिशय पुरातन काळात असून या मंदिराला आता शासनाकडून आधार मिळेल का असेच बोलले जात आहे महाराष्ट्र शासनाकडून व प्रत्येक विभागाकडून वेळोवेळी पुरातनकालीन व हेमाडपंती मंदिरांना खूप मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो परंतु या मंदिराकडे मात्र पुरातत्त्व विभागाने साफ दुर्लक्ष केले आहे असे म्हटले जात आहे या ठिकाणी मकरध्वज असलेले मंदिर हे अतिशय पुरातन कालीन होते परंतु सर्व ग्रामस्थांनी मिळून या मंदिराला उभारण्यासाठी 40 लक्ष रुपये ग्रामस्थाच्या माध्यमातून वर्गणी जमा करून या मंदिराचा कळस उभारण्यात आलेला आहे वेळोवेळी शासनाकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे की मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा परंतु या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केलेले आहे राजा मकरध्वजाचे मंदिर देशामध्ये दोन ठिकाणी एक काशीमध्ये आणि एक बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिंचवण या गावामध्ये असून  गेल्या अनेक वर्षापासून हे मंदिर मात्र पुरातत्त्व विभाग व शासन प्रशासनाकडून लक्ष देत आहे परंतु आता पुरातत्त्व विभाग व शासनाने येथील हेमाडपंती असलेले महादेवाचे मंदिर विठ्ठल रुक्माई चे मंदिर व मंकावती मंदिर हे आहे या ठिकाणी असलेले हेमाडपंती मंदिर आहे अतिशय शासनाकडून पुरातत्व विभाग का पासून दुर्लक्षित आहे त्यामुळे आगामी काळात पुरातत्त्व विभाग व शासनाने या हेमाडपंती मंदिर मंदिरांना  निधी उपलब्ध करून दिला तर पुरातन कालीन व इतिहास कालीन असलेला हेमाडपंथी मंदिरांचा ठेवा कायम राहील असे म्हटले तर वावगे ठरणार नाही


राजकीय नेतृत्वाने गावचा सत्यानाश केला...!

गावातील राजकीय नेतृत्वामुळे गावाला दुर्लक्षित रहावे लागला आहे राजकीय नेतृत्वाने स्वतःचे स्वार्थापायी कुठल्या प्रकारचा पुरातन ठेवा असलेल्या हेमाडपंती असलेल्या मंदिरांना शासन प्रशासन व पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा केला नाही त्यामुळे हे मंदिर अतिशय खूप मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित राहिले आहे गावचा कुठलाही विकास व्हावा व गाव प्रगतीच्या वाटेने जावे अशा प्रकारचा विचार राजकीय नेतृत्वाने केला नाही त्यामुळे एवढा मोठा इतिहासकालीन व हेमाडपंती कालीन ठेवा असलेला मात्र शासनाकडून दुर्लक्षित राहिला आहे राजकीय नेतृत्वाच्या हेव्यादाव्यांमुळे  विकास खुटला आहे त्यामुळे आगामी काळात राजकीय नेतृत्वाने एकसंघ होऊन या हेमाडपंती व पुरातन कालीन मंदिरासाठी शासन दरबारी जन आंदोलन उभारण्याची गरज आहे.
दत्ता वाकसे
             दत्ता वाकसे
बीड जिल्हाप्रमुख धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत 
मो.8378982121

1 comment: