Breaking News

बीड तालुका कृषी व विज्ञान केंद्राची शेेती शिवार फेेरी..!


बीड :  तालुक्यातील कापूस पिकावरील शेंदरी बोंडआळी व रसशोषक किडी वरील उपाय योजनेकरिता तालुका कृषी अधिकारी कार्यालय बीड व कृषी विज्ञान केंद्र खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिवारफेरी ला सुरुवात करण्यात आली.
तालुक्यातील कापूस या पिकावर मोठ्या प्रमाणात रस शोषण करणाऱ्या किडी व झालेल्या जास्तीचा पाऊस व त्यामुळे पिकावर होणारा वाईट परिणाम या पार्श्वभूमीवर तालुका कृषी अधिकारी बीड व कृषी विज्ञान केंद्र खामगाव यांच्या वतीने मंडळ कृषी अधिकारी कार्यालय बीड 1 अंतर्गत वडगाव गुंदा, कुकडगाव व औरंगपूर आदीं गावांमध्ये विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तालुका कृषी अधिकारी बीड श्री मुनेश्वर बी आर व कृषी विज्ञान केंद्राचे श्री गायकवाड, श्री किनगावकर व श्री जगताप सर यांनी कापूस व इतर फळपिकांची प्रत्यक्ष पाहणी करून मार्गदर्शन केले.
     या  शिवार फेरी कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी श्री नागरगोजे कृषी सहाय्यक श्री नालपे कृषी सहाय्यक श्री शिरसाट व गावातील मोठ्या प्रमाणात शेतकरी यावेळी उपस्थित होते. 

No comments