Breaking News

राज्यातील मंदिरे सुरु करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी


अकोला : वंचित बहूजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मंदिर प्रवेशावर सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. प्रकाश आंबेडकरांनी ३१ ऑगस्टला पंढरपूर येथे होणाऱ्या मंदिर प्रवेश आंदोलनाला आपल्या पक्षाचा पाठिंबा जाहिर केला असून या आंदोलनात स्वत: सहभागी होणार असल्याचे  आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.  दरम्यान या आंदोलनात पंढरपुरातील वारकरी संप्रदायातील संत आणि मठांच्या प्रमुखांना सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. 

कोरोनाच्या प्रकोपापासून राज्यातील सर्वच मंदिरं भाविकांसाठी बंद आहेत. संपूर्ण महाराष्ट्राच्या आस्थेचा विषय असणारी पंढरपूरची वारीही यावर्षी प्रतिकात्मक रूपातच आटोपावी लागली. ऑगस्ट महिन्यात आंबेडकरांनी राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या ३१ ऑगस्टला पंढरपुरला 'विश्व युवा वारकरी सेने'चं मंदिर प्रवेशासाठी आंदोलन आहे. या आंदोलनात स्वत: प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. या दिवशी एक लाख वारकऱ्यांसोबत पंढरीतील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात प्रवेश करण्याचा इशारा आंबेडकरांनी सरकारला दिला आहे.

No comments