Breaking News

धक्कादायक : लॉकअप मधील दोन आरोपी कोरोना पॉझिटिव्ह !


पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ, त्या आरोपींना न्यायालयात केले होतं हजर
अविनाश इंगावले । गेवराई
एका गुन्ह्यात लॉकअप मध्ये असलेल्या दोन आरोपींची कोरोना टेस्ट करण्यात आल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान त्या आरोपींना न्यायालयात ही हजर करण्यात आल्याचं समजते.
सूत्रांच्या माहितीनुसार तीन दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने चार वाळूच्या गाड्या पकडल्या होत्या. याप्रकरणी गेवराई तालुक्यातील एका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर दोन्ही आरोपींचा स्वॅब घेण्यात आला होता. त्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान त्या आरोपींना न्यायालयात ही हजर करण्यात आल्याचं समजते. दरम्यान गेवराई तालुक्यातील त्या पोलीस ठाण्यातील १४ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे गेवराईचे तालुका आरोग्य अधिकारी संजय कदम म्हणाले.

No comments