Breaking News

केज पोलीस स्टेशनच्या प्रांगणात अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या हस्ते वृक्षारोपण

गौतम बचुटे । केज  
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत केज पोलीस स्टेशनच्या प्रांगणात अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

केज पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या प्रांगणात आणि पोलीस वसाहतीच्या समोर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी १५ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या उदघाटीका म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर तर अध्यक्ष म्हणून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन हे होते. या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक
आज रोजी पोलीस श्रीमती स्वाती भोर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून उदघाटन सोहळा  संपन्न झाला. तसेेेच या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप त्रिभुवन
त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, पोलीस उपनिरीक्षक अर्चना भोसले यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा वृक्षारोपण सोहळा संपन्न होत असल्याने सामाजिक अंतर आणि सर्व नियम पाळून कार्यक्रम यशस्वी केला.

No comments