Breaking News

आनंददायक : बाधीत पोलीसांनी कोरोनावर केली मात

राजेश स्वामी। दिंद्रुड 
माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलिस स्टेशन च्या चार पोलिस कर्मचारी व एक वाहन चालक यांना कोरोना ची लागण झाल्याचे निदान २० व २१ आॅगस्ट रोजी माजलगाव येथे केलेल्या अॅन्टीजेन्ट तपासणी त उघड झाले होते.
माजलगाव येथिल कोवीड सेंटर येथे नऊ दिवसांचे उपचारानंतर सर्व पोलिस रुग्णांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह मिळाले असुन यामुळे दिंद्रुड पोलिसांना आज कोविड सेंटर येथुन सुट्टी मिळाली. आरोग्य विभागाने सर्वांना पुढिल सात दिवसांच्या गृहविलगीकरणाच्या सुचना दिल्या आहेत. कोरोना काळात आरोग्याची तमा न बाळगता सेवा बजावणार्या सर्व पोलिस बांधवांनी कोरोना वर मात केल्याने  दिंद्रुड पोलिस ठाणे प्रमुख सपोनि अनिल गव्हाणकर यांच्या सह सर्व पोलिस बांधवांनी आनंद व्यक्त केला आहे.

No comments