Breaking News

पिकअपच्या धडकेने दुचाकीस्वार ठार ; एक जखमी


भीषण अपघातात दुचाकीचा झाला चुराडा , विडा येथील घटना 
केज :  पिकअप आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाला तर दुचाकीवरील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात केज तालुक्यातील विडा गावालगत असलेल्या तळ्याजवळ गुरुवारी ( दि. २० ) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास झाला. 

          केज तालुक्यातील बुरंडवाडी येथील धनराज रंगनाथ भोसले ( वय ३० ) व सुशेन जालिंदर भोसले ( वय २५ ) हे दोघे गुरुवारी केजला कामानिमित्त गेले होते. काम आटपून सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून ( एम. एच. ४४ डब्ल्यू ५६९६ ) परत गावाकडे  निघाले होते. त्यांची दुचाकी केज - विडा रस्त्यावरील विडा गावालगत असलेल्या तळ्याजवळ आली असता विडा येथून घाटेवाडीकडे निघालेल्या पिकअपची ( एम. एच. २३ डब्ल्यू ०३२१ ) आणि त्यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीवरील धनराज रंगनाथ भोसले ( वय ३० ) हा तरुण जागीच ठार झाला. तर सुशेन भोसले हा तरुण गंभीर झाला असून त्याला उपचारासाठी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघातात दुचाकीचा चुराडा झाला असून अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच केजचे फौजदार श्रीराम काळे, जमादार बाळकृष्ण मुंडे, पोलीस नाईक धनपाल लोखंडे, पोलीस नाईक श्रीराम चेवले हे घटनास्थळी दाखल झाले होते. 

No comments