Breaking News

बजरंग सोनवणे यांच्या प्रयत्नाने कळंबअंबा आणि कौडगाव येथील शाळेच्या अनुक्रमे सहावी व पाचवीच्या वर्गास मान्यता

गौतम बचुटे । केज
जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या पाठपुराव्यामुळे केज तालुक्यातील कळंबआंबा आणि कौडगाव येथील विद्यार्थी व पालक यांची समस्या दूर झाली असून तेथील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची सुविधा उपल्ब्ध झाली आहे.

केज तालुक्यातील होळ केंद्रातील कळंबअंबा येथे जिल्हा परिषदेची पाचवी पर्यंत आणि बनसारोळा केंद्रातील कौडगाव येथे इयत्ता चौथी पर्यंत वर्ग होते. तेथील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागत असे. ही अडचण पालकांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या निदर्शनास आणून देताच बजरंग सोनवणे यांनी या दोन्ही गावातील विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणाची व्यवस्था गावातच करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार सोनवणे यांनी सभागृहात पुढील वर्गाला मान्यता देण्यासाठी कार्यवाही केली. त्या नुसार दि. २० ऑगस्ट रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजित कुंभार यांनी दोन वेगवेगळे आदेश निर्गमित केले असून त्यात कळंबअंबा व कौडगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये अनुक्रमे सहावी आणि पाचवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. 
यामुळे दोन्ही गावातील विद्यार्थी, पालकू आणि शिक्षणप्रेमी नागरिक यांच्याकडून बजरंग सोनवणे यांचे कौतुक होत आहे. तर पंचायत समिती सदस्य बंडू चौधरी, गुंडाप्पा भुसारी, सरस्वतीताई शिंदे यांनी आणि कळंबअंबाचे व कौडगावचे सरपंच चाटे यांनी बजरंग सोनवणे यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहेत.

No comments