Breaking News

शिरूर कासार तालुक्‍यात गुलाबी बोंड आळीची कृषी विभागाकडून जनजागृती मोहिम संपन्न


भारत पानसंबळ । शिरुर कासार
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ  खामगाव अंतर्गत जिल्ह्यातील गेवराई व बीड येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ व कृषी विभागाच्या वतीने संयुक्तपणे कापूस पिकावरील कापूस पिकावरील गुलाबी बोंड आळी नियंत्रण जनजागृती मोहीम याचे आयोजन  तालुका कृषी विभागाच्या  सोमवारी करण्यात आले होते.


     यावेळी तालुक्यातील हिंवरसिंगा, नागणेवाडी,पाडळी खालापुरी ,आर्वी, जाब खालापरी या गावात कृषी विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी व विज्ञान केंद्रा'चे शास्‍त्रज्ञ यांचे कापूस लागवड केलेल्या क्षेत्रास भेट देऊन उपस्थित शेतकऱ्यांना कापूस पिकावर रस शोषण करणाऱ्या मावा ,तुडतुडे ,फुलकिडे ,पिठ्या ढेकूण तसेच गुलाबी बोंड अळी नियंत्रणाबाबत एकात्मिक कीड नियंत्रणाच्या पद्धती बाबत मार्गदर्शन करण्यात आली.           कापूस पिकावर रस शोषण करणाऱ्या किडी नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे ,निळेचिकट सापळे प्रति हेक्‍टरी 25 कापूस लागवड केलेल्या शेतात कापसाच्या उंचीबरोबर लावावी त्यामुळे या चिकट सापडला रस शोषण करणाऱ्या किडी चिटकून नष्ट होतील व अत्यंत कमी खर्चात नियंत्रण होते हे सांगितले.

      तसेच गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी पाच ते सहा कामगंध सापळे प्रति हेक्‍टरी कापसाच्या शेतात कापूस झाडाच्या उंची पेक्षा एक ते दोन फूट उंचीवर लावावे.

        तसेच डोमकळी आढळून आली तर त्याचा नायनाट करावा हे सांगून एकात्मिक कीड नियंत्रणाचे उपाय करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले, सापळ्यात सतत दोन ते तीन दिवस आठ ते दहा पतंग आढळून आले तर म्हणजे आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असे तर प्रोफेनोफाॅस 40 टक्के+ सायपरमेथीन 4 टक्के हे संयुक्त कीटकनाशक फवारावे तसेच गरज पडल्यास थायोडीकाबऺ 7.5टक्के डब्लु .पी.हे कीटकनाशक फवारावे हे सांगितले .

एका कीटकनाशकाची एकदाच  फवारणी करावी

            या वेळी कृषी विज्ञान केंद्रा खामगाव ची डॉक्टर अजय किणखेडकर ,डॉक्टर बी.बी. गायकवाड प्राध्यापक श्री के.एल.आढावे कार्यक्रम सहाय्यक व कृषी विभागाचे बी.बी.बांगर उपसंचालक बीड तथा तालुका कृषी अधिकारी शिरूर ,मंडळ कृषी अधिकारी , कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक आणि तालुक्यातील शेतकरी हजर होते .
या कार्यक्रम मार्गदर्शन शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

No comments