Breaking News

फायनान्सवाले टॅक्सी लोनच्या हप्त्यासाठी वाहन मालकांना धरतायेत धारेरवर

* लॉकडाऊन मुळे सहा महिन्यांपासून टॅक्सी एकाचं जागेवर

*टॅक्सी मालकांच्या कुटूंबावर उपासमारीची आली वेळ मात्र हप्त्यासाठी फायनान्सवाले लावतायेत  तगादा

*सरकारच्या आदेशाला फायनान्सवाले तुडवतायेत पायदळी, वाहनचालकांसह मालक हतबल

राजू जोगदंड । बीड 

कोरोनामुळे देशातच नव्हे तर राज्यातही अंतर जिल्हा प्रवाशी वाहतुकीला पायबंद घालण्यात आला. त्यामुळे गत पाच महिन्यांपासून प्रवाशी वाहतुक ठप्प झाली असून वाहनचालक- मालकांच्या दारात वाहने उभी आहेत. प्रवाशी वाहतूक बंद असल्यानं वाहन चालक- मालक आर्थिक अडचणीत आले असून त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच हतबल झालेल्या वाहन चालक- मालकांकडे खासगी फायनान्स कंपन्यांनी वाहनकर्जाच्या हप्त्यासाठी तगादा लावला जातोय. मात्र सप्टेंबर पर्यंत कर्जाच्या परत फेडीच्या हप्त्यासाठी बँकांसह खासगी फायनान्सने कर्जदारकडे मागणी करु नये, असे सरकारने स्पष्ट निर्देश दिलेत. परंतु सरकारच्या आदेशाला पायदळी तुडवत फायनान्सवाल्यांनी टॅक्सी मालकांना सळो की, पळो केल्यानं टॅक्सी मालकांचं जीवन म्हणजे इकडं आडं, तिकडं विहीर झाल्याचे दिसत आहे. आपत्तीच्या  काळात मस्तवाल खासगी फायनान्सवाल्यांना शासन- प्रशासन लगाम लावणार आहे, की नाही असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

बीड जिल्ह्यात रोजगाराचे साधन नसल्याने अनेक बेरोजगार तरुणांनी खासगी प्रवासी वाहतूकीचा व्यवसाय निवडला आणि फायनांन्सवर वाहने घेऊन आपला स्वयं रोजगार सुरू केला. आज घडीला जिल्ह्यात हजारोच्या संख्येनं खासगी प्रवासी वाहनांवर बेरोजगार तरुण आपल्या कुटूंबाचा गाढा ओढत आहेत. मात्र मार्चच्या शेवटी कोरोनाच्या आपत्तीमुळे देश लॉकडाऊन करण्यात येवून कोव्हिड -१९ चा प्रादुर्भाव होऊ नये. म्हणून देशातंर्गत नव्हे तर राज्यात पर्यायाने अंतर जिल्हा प्रवाशी वाहतूक सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील खासगी प्रवाशी वाहतूक व्यवसायाशी निगडीत असलेल्या तरुणांवर पुन्हा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. 
प्रतिकात्मक
तब्बल पाच महिन्यांचा कालावधी लोटत असताना आशा हालकीच्या परस्थितीत फायनान्स कंपन्यांनी वाहन कर्जाच्या परतफेडीच्या हप्त्यासाठी टॅक्सी मालकांकडे घिरट्या घालत असून परतफेडीच्या रक्कमेसाठी त्यांच्याकडं तगादा लावला जातोय. लॉकडाऊनमुळे आपलं "अर्थ'चक्र थाबल्यानं आणि फायनान्सवाल्यांच्या तगाद्यामुळं टॅक्सी मालकांचे मात्र डोके चक्रावले असून त्यांचं कुटूंब ही हैराण झाले आहे.   देशातील कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेमुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर पर्यंत कोरोना आपत्तीच्या काळात कर्जदारांना बँकांनी व खासगी फायनान्स कंपनीनी कर्जाच्या परतफेडीच्या रक्कमेची सक्तीने वसुली करू नये, असे स्पष्ट आदेश दिलेत. मात्र बीड मध्ये फायनान्सवाल्यानी सरकारच्या आदेशाला झुगारून  टॅक्सी मालकांना हप्त्यासाठी वेठीस धरले जात आहेत. 

अंतर जिल्हा प्रवाशी वाहतूक बंद असल्याने फायनान्सवर घेतलेली टॅक्सीची चाकं थांबली आहेत. त्यातच फायनांसवाल्यांकडून सतत फोन करुन टॅक्सी मालकांसोबत हप्त्यासाठी हुज्जत घालतायेत. दारापुढं उभी असलेली टॅक्सी पाहून रोजचं फायनांसवाल्याना काय उत्तर द्यावं, हाच प्रश्न टॅक्सी मालकांना सध्या भेडसावत असून त्याचं कुटूंब ही यामुळं धास्तावल्याचे  दिसत आहे. कर्जाच्या परतफेडीच्या रक्कमेची आपत्तीच्या काळात वसुली करू नये.  या बाबत सरकारचे स्पष्ट आदेश असताना बीडमध्ये अशा प्रकारे कर्जाच्या परतफेडीसाठी फायनान्सवाले सक्ती करत असतील तर जिल्हाधिकारी राहुल रेखावावर अशा फायनान्सवाल्यांवर काय कारवाई करणार असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. 

फायनान्सवाल्यांच्या  दंडेलशाहीमुळे जगणे झाले मुश्किल....!
खासगी प्रवासी वाहतूक बंद झाल्याने आमच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच फायनान्सवाले रोजचं टॅक्सीच्या परतफेडीच्या रक्कमेच्या हप्त्यासाठी फोन करुन तगादा लावत आम्हाला वेठीस धरत आहेत. घरासमोर गाडी उभा आहे, मात्र अंतर जिल्हा प्रवाशी वाहतूकिला बंदी आहे. त्यामुळे टॅक्सीच्या कर्जाच्या हप्ता भरणा शक्य होत नाही, परंतू त्यावर विलाज नाही. फायनान्सवाले दंड आकारण्याची धमकी देत असल्यानं फायनान्सवाल्यांच्या  दंडेलशाहीमुळे कोरोनात जगणे अधिकच कठीण झाल्याची हताश प्रतिक्रीया टॅक्सी मालकांनी "दृष्टिकोन" शी बोलतांना व्यक्त केल्या.

No comments