Breaking News

कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना खरीप पिकाविषयी मार्गदर्शन !

भारत पानसंबळ। शिरुर कासार 

कृषि विभागाच्या वतीने मलकाचीवाडी, औरंगपुर शिरापुर आणि हिंवरसिगा येथील शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालय मार्फत सोयाबीन आणि कापूस पिकावरील किड व्यवस्थापन मार्गदर्शन प्रक्षेत्र भेट कृषी सहाय्यक डी.एस माळी यांच्या कार्यक्षेत्रात आयोजित
करण्यात आले.


 पोळ्यानंतर झालेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकात काही ठिकाणी अतिरिक्त कायिक वाढ झाल्याचे आढळून येत आहे . मागील दहा दिवसात झालेल्या संततधार पावसामुळे शेतात वापसा नसल्यामुळे सोयाबीनच्या खालच्या भागात आर्द्रता वाढून काही बुरशीजन्य रोग जसे शेंगावरील करपा , पानावरील बुरशीजन्य ठिपके या रोगाच्या प्रादुर्भावाबरोबरच खोडमाशी , स्पोडोप्टेरा आणि शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे . 

सध्या सोयाबीन पिक हे 60 ते 65 दिवसाचे असून शेंगामध्ये दाने भरण्याच्या अवस्थेत आहे . अशा परिस्थिती मध्ये खाली दिलेल्या किटकनाशकापैकी एक किटकनाशक आणि बुरशीनाशकापैकी एका बुरशीनाशकाची निवड करून तात्काळ फवारणी घेतली असता किडींचे आणि बुरशीजन्य शेंगाचे नियंत्रण होऊन चांगल्याप्रकारे शेंगात दाना भरण्यास मदत होईल . 

फवारणी करत असताना पायात गुडघ्यापर्यंत शूज वापरावेत त्याबरोबरच नाक आणि तोंड स्वच्छ कापडाने झाकण्याबरोबरच संरक्षणात्मक कीट चा वापर करावा.

सोयाबीन साठी किटकनाशके : १. क्लोरॅनट्रिनीलीप्रोल 18.5 % 03 मिली किंवा २. पल्यूबेंडामाईड 39.35 % 2.5 मिली प्रति 10 लिटरपाणी फवारणी करावी.

सोयाबीन बुरशीनाशके : 

१. टेब्यूकोनॅझोल + सल्फर 20 ग्रॅम 

२. गॅन्कोझेब + कार्बेन्डॅझीम -20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी . वरील किटकनाशके व बुरशीनाशकाची फवारणी करावी.

कापूस पिकावरील कापूस पिकावर रस शोषण करणाऱ्या मावा ,तुडतुडे ,फुलकिडे ,पिठ्या ढेकूण तसेच गुलाबी बोंड अळी नियंत्रणाबाबत एकात्मिक कीड नियंत्रणाच्या पद्धती हेक्टरी 10 ते12 फेराॅमन टॅप वापर करून दररोज सकाळी निरीक्षक घ्यावी जर त्या टॅप मध्ये सहा ते आठ गुलाबी बोंड अळी पतंग आढळून आल्यास किटकनाशके फवारणी करावी 1. प्रोफेनोफाॅस 40 टक्के+ सायपरमेथीन 4 टक्के हे घटक असलेले  संयुक्त कीटकनाशक 20 मिली 10लिटर पाणी मिसळून फवारावे तसेच गरज पडल्यास कापूस पिकावर रस शोषण करणाऱ्या मावा ,तुडतुडे ,फुलकिडे ,पिठ्या ढेकूण तसेच गुलाबी बोंड अळी नियंत्रणाबाबत एकात्मिक कीड नियंत्रणाच्या पद्धती हेक्टरी 10 ते12 फेराॅमन टॅप वापर करून दररोज सकाळी निरीक्षक घ्यावी जर त्या टॅप मध्ये सहा ते आठ गुलाबी बोंड अळी पतंग आढळून आल्यास किटकनाशके फवारणी करावी 1. प्रोफेनोफाॅस 40 टक्के+ सायपरमेथीन 4 टक्के हे घटक असलेले  संयुक्त कीटकनाशक फवारावे.

 तसेच गरज पडल्यास फेनप्रोपथीन 10ईसी 10लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकामध्ये डोमकळी आढळून आल्यास गोळा करून नष्ट करावी. तालुकाकृषी अधिकारी भिमराव बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीन आणि कापूस पिकामध्ये एकात्मिक किड व्यवस्थापन मार्गदर्शन कृषी सहाय्यक दत्तगणेश माळी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले, यावेळी कृषी पर्यवेक्षक अंगद कोठावळे, कृषीमित्र महादेव देवकर,मोकींदा दुधाळ,रवी दुधाळ, संतोष सस्ते,सुदाम बहीर, संदीप खेडकर, अंबासाहेब  सानप     इतर शेतकरी उपस्थित होते.

No comments