Breaking News

सरकारला सदबुद्धी मिळो, बाप्पाचरणी आ.सुरेश धसांची प्रार्थना


के. के. निकाळजे । आष्टी
कोरोनाच्या महामारीत जनता पिळवटून गेलेली असताना राज्यकर्त्यांना याचे तसूभरही भान नसल्याचे चिञ सध्या राज्यात दिसून येत असल्याने महाविकास आघाडी सरकारला बाप्पानी सदबुद्धी द्यावी अशी बोचरी टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नासह कोरोना महामारीत चांगलं काम व्हावं असं साकडं आ. सुरेश धस यांनी गणरायाला घातले आहे.

भाजप आ.सुरेश धस यांच्या निवासस्थानी शनिवारी गणराया विराजमान झाले.यावेळी कुटुंबीयांच्या वतीने बाप्पांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.याप्रसंगी बाप्पाच्या चरणी आ.धस यांनी कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्णपणे जनजीवन विस्कळीत झालेले असून या कोरोनाच्या महासंकटातून सर्वाना लवकरच सावरण्याची प्रार्थना बाप्पा चरणी करताना.सद्यस्थितीत शेतक-यांच्या विविध प्रश्नावर सरकारने लक्ष देणे गरजेचे असून सरकारला या कोरोनाच्या महामारीत चांगल काम करण्याची सद्बुद्धी गणरायाने द्यावी असे साकड घातल आहे.यावेळी सहकुटुंबियांनी श्रीगणेशाची स्थापना करुन महाआरती केली.

No comments