Breaking News

ना मिरवणूक ना गाजावाजा ; कोरोनाच्या भीतीने गोठ्यातच पुजला सर्जा- राजा !


केज तालुक्यात साध्यापणाने साजरा केला बैलपोळा

गौतम बचुटे । केज 
बैल पोळा हा सण शेतकरी आणि त्याची शेती ज्यांच्यावर अवलंबून आहे अशा बैंलांचा महत्वाचा सण पण आहे पण यावर्षी कोरोनाच्या भीतीने कोणताही गाजावाजा न करता शेतकऱ्यांनी आपापल्या घरी बैलांची पूजा करून बैल पोळा हा सण साजरा केला.


शेतकरी बांधवांचा आणि त्यांना साथ देणाऱ्या गोधनांचा बैल पोळा हा सण खूप महत्त्वाचा समजला जातो. या दिवशी शेतात राबराब राबणाऱ्या बैलांना गोडगोड खाऊ घालून त्यांच्या अंगावर रंगीबरंगी झुली चढवल्या जातात तसेच शिंगात पितळी शेंब्या, गळ्यात घुंगर माळा, सर, म्होरक्या, कासरा, रंगी बेरंगी गोंडयाचे माळा, शिंगांना फुगे बांधून व स्वच्छ धुवून बैल सजवले जातात त्यांची वाद्यांच्या साथीने व शोभेच्या दारूची आतिषबाजी करून गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्याची परंपरा आणि प्रथा आहे. मात्र या वर्षी कोरोना महामारीच्या भीतीने आणि मा जिल्हाधिकारी साहेबानी जारी केलेल्या आदेशांचे पालन करीत शेतकऱ्यांनी अत्यंत साध्या पणाने आणि घरच्या घरी बैलपोळा हा सण साजरा केला. ना कोणताही आरास ना गाजावाजा ; शेतकऱ्यांनी कोरोनाच्या भीतीने गोठ्यातच पुजला आपला सर्जा अन् राजा !

No comments