Breaking News

शिवरायांचा पुतळा हटवणाऱ्या कर्नाटकी भाजपा चा जाहीर निषेध:-राजेंद्र आमटे

कर्नाटकी भाजपा सरकारला शिवरायांचा इतका द्वेष का?

बीड :  जगातवंदनीय छत्रपती शिवाजी महाराजाना महाराष्ट्र नव्हे, देश नव्हे जगात एक आदर्श,न्यायप्रिय, शूर ,पराक्रमी जाणता राजा म्हणून जगात ख्याती आहे.शिवरायांचा आदर्श समोर ठेऊन क्यूब सारखे छोटासा देश महासत्ता हरवू शकतो आशा महान आदर्श शिवरायांचा प्रेरणादायी स्मारक कर्नाटकी भाजपा सरकारच्या डोळ्यात सलते का? महाराष्ट्रात येऊन चला घेऊ शिवरायांचा आशिर्वात,देऊ मोदिला साथ म्हणून मताचा जोगवा मागणाऱ्या भाजपा च्या कर्नाटकातील सरकारला शिवरायांच्या विषयी इतका द्वेष का? कर्नाटकात बेळगाव जिल्ह्यात मानगुती गावात पोलीसांच्या मदतीने शिवरायांच्या पुतळा काढला जातो याचा अर्थ तेथील सरकार, प्रशासन, यांच्या सहमतीने काढण्यात आला.  शिवरायांचा पुतळा काढणाऱ्या कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करण्यात येत आहे.

      शिवरायांच्या पुतळा काढण्यात सहभागी असणारे कर्नाटक सरकार मधील मंत्री ,पोलीस अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे शिवरायांचा पुतळा पुन्हा सन्मानाने बेळगाव मधील मानगुती गावात उभा करावं अन्यथा शिवप्रेमीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राजेंद्र आमटे,केशव अबुज,शरद तिपले,दादा घोरड,लाटे तात्यासाहेब, घोडके पांडुरंग, राजू सय्यद,मोहन गव्हाणे,संपत गव्हाणे,अजित दासवंते,मुलूक वासुदेव,बाळू शेळके,कृष्णा तळेकर, संजय तिपले,सचिन आमटे,किशोर आमटे,गणेश आमटे,नानासाहेब आमटे,कृष्णा आमटे, आदींच्या वतींने जाहीर निषेध करण्यात येत आहे 

No comments