Breaking News

आष्टीत कोरोना बाधित रुग्णांना अंडे व केळी वाटप

ॲड.बाळासाहेब मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम

आष्टी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव काळात कोरोना बाधित रुग्णाला कोविड सेंटर मध्ये सध्या जेवण तसेच उपजीविकेचे साधन पोचवणे एक दिव्य ठरत आहे. अशा वेळी कोरोना बाधित रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तसेच कोरोना बाधित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह यावा.हा दृष्टीकोन समोर ठेऊन आष्टी शहरात मॉर्निग ग्रुपच्या सदस्यांनी ॲड.बाळासाहेब मोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना बाधित रुग्णांना अंडे व केळी देऊन एक आगळावेगळा आदर्श उपक्रम राबविला आहे. 
अशा प्रसंगी मदत करणे ही आपली नैतिकता व माणुसकी म्हणून सामाजिक जबाबदारी असल्याचे मला समजते असे यावेळी ॲड. बाळासाहेब मोरे यांनी मत व्यक्त केले.
तीसहुन अधिक रूग्णांना यावेळी अंडे व केळीचे प्रयोजन करून कोविड सेंटर वरील कर्तव्यावर असलेल्या डॉ.फुलचंद खाडे, जेवण व्यवस्थापक शशिकांत डोमकावळे व कर्मचारी यांच्याकडे पोहच केले.
यावेळी सोमनाथ गायकवाड,प्रयोगशाळा अधिकारी नागेश करांडे,मोहन गलांडे,अजित शिक्केतोड,पत्रकार गणेश दळवी,पत्रकार प्रविण पोकळे,दिपक साळुंके, अशोक पोकळे,सतिश धोंडे, संतोष शेटे,गणेश भराटे आदी मॉर्निग ग्रुप चे सदस्य उपस्थित होते.

No comments