Breaking News

गणपती बाप्पा या महामारीतून सर्वांना सुखरूप बाहेर काढ - आ.संदिप क्षीरसागर यांचे गणरायाकडे साकड


बीड  : प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी गौरी गणपतीचे शुभागमन होत आहे. परंतू या महोत्सवावर या वर्षी कोरोना-१९ चे सावट असल्यामुळे या आनंदोत्सावर विरजण पडले आहे. गणेश गौरीचा उत्सव आपण आपल्या घरीच सर्व कुटुंबियांसोबत साजरा करावा व गणेश मंडळांनी प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे असे आवाहन आ. संदिप भैय्या क्षीरसागर यांनी केले आहे. आज बाप्पाच्या आगमनने वातावरण आनंदमय झाले व कुटुंबासोबत गणरायाची स्थापना केली.
माणसं जगवण्याला प्राधान्य द्या, सन, उत्सव तथा महापुरषांचे जन्मोत्सवा प्रमाणे गणेशोत्सव हा पुढच्या वर्षी उत्साहात साजरा करता येईलच. आपलं घरदार सोडून दिवसरात्र रुग्णांची सेवा करणाऱ्या सर्व पोलीस बांधवांना, डॉक्टराना, नर्स, वार्ड बॉय व इतरांना कोरोना या महामारी सोबत लढण्याचं बळ दे असे साकडे आ. संदिप भैय्या यांनी यावेळी गणरायाकडे केली व  नागरिकांनी ही विनाकारण घरा बाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, नेहमी तोंडाला मास्क किंवा रुमाल वापरावा, लहान मुलांची व वयोवृद्ध, वडीलधाऱ्या माणसाची काळजी घ्यावी असे आवाहन आ. संदिप भैय्या क्षीरसागर यांनी केले आहे.  

No comments