Breaking News

आ.सुरेश धस मित्र मंडळाच्या वतीने गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन

आष्टी : आ. सुरेश धस मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी अनेक उपक्रम राबवले जातात.असाच एक आगळावेगळा उपक्रम यावर्षी गणेश उत्सवानिमित्त आष्टी व मुर्शदपुर शहरासाठी करण्यात आला असून यावर्षी गौरी गणपतीच्या सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्धर्धा आष्टी व मुर्शदपुर या शहरासाठीच मर्यादित असून, गौरी गणपती सजावटीचे २ फोटो हे ४×६ साईजमध्ये बंद पाकिटात आपले नाव,पत्ता व मोबाईल नंबर सह स्पर्धकांनी द्यावेत. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना सन्मानचिन्ह देखील देण्यात येणार आहे. स्पर्धेचा निकाल आपल्याला आपण दिलेल्या क्रमांकाच्या व्हाट्सअप वर पाठवला जाईल व आपले सन्मानचिन्ह देखील आपल्याला घरपोच केले जाईल. तुम्ही काढलेला फोटो २७ ऑगस्ट २०२० पर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयोजन कमिटीकडे पोहोच करावा. या स्पर्धेचे नियम व अटी असणार आहेत. ही स्पर्धा निशुल्क असून स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस ३००१, द्वितीय बक्षीस २००१,  आणि तृतीय बक्षीस १००१ रुपये असणार आहे.या स्पर्धेसाठी ९८६०२७३३००,८८३०३९६३०० या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन आ. सुरेश धस मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments