Breaking News

पालकमंत्री धनंजय मुंडेंचे मानवी हक्क अभियानने मानले आभार..!

अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी करणार प्रयत्न : धनंजय मुंडेंने दिलं अश्वासन

बीड : साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. यासाठी मी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी येथे दिले. त्यामुळे मातंग समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

स्वातंत्र्य स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनानिमित्त बीडमध्ये आयोजित मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात ते शनिवारी (दि.१५) बोलत होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून मातंग समाजातून होत आहे.   
अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. यासाठी मी, प्रयत्न करणार आहे, असा उल्लेख त्यांनी केला आहे. त्यामुळे समाजात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. ना. धनंजय मुंडे यांचं मानवी हक्क अभियानाचे युवा जिल्हा उपाध्यक्ष राम वाघमारे, नितीन अडागळे, धोंडीबा हातागळे, आकाश वाघमारे आदींनी त्यांचं अभिनंदन करून आभार मानले आहेत.

No comments