Breaking News

गणेश विसर्जना बाबत केज नगर परिषदेनं काय केलं आवाहन


गौतम बचुटे । केज 
अनंत चतुर्दशीच्या निमीत्ताने गणेश विसर्जनाच्या बाबत केज नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी सर्व गणेश भक्तांना आवाहन केले आहे की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनकडून विविध उपाय योजना करण्यात येत आहेत.
तरी नागरीकांनी दिनांक १ सप्टेंबर रोजी श्री. गणरायाचे विसर्जन करताना खालील सूचनांचे पालन करावे. रस्त्यावर व विसर्जनाची ठिकाणी गर्दी होणार नाही. या करीता घरगुती गणेश मुर्तीची ज्यांनी स्थापना केली असेल अशा गणेश भक्तांनी घराच्या बाहेर न पडता घरीच आरती करुन विसर्जनासाठी गणेश मुर्ती नगर पंचायतने उपलब्ध करुन दिलेल्या वाहनात विसर्जनासाठी द्यावेत. सदरचे वाहन प्रत्येक भागत फिरणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक, कानडी चौक आणि मंगळवार पेठ या ठिकाणी सुध्दा गणेश मुर्ती स्विकरण्यासाठी संकलन केंद्र उभारण्यात आलेले आहे. नागरीकांनी गणेश मुर्ती सदरच्या ठिकाणी आणुन दयावेत. विसर्जनाच्या ठिकाणी कोणीही जावू नये. तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करुन मंडळांच्या श्रींची आरती व इतर पुजा दुपारी ४:०० वाजेपर्यंत स्थापन केलेल्या ठिकाणी करुन घ्यावी. तद्नंतर नगर पंचायतचे संकलन वाहन सदरील ठिकाणा वरुन श्री. गणेशमुर्ती घेवून जातील. गणेश मुर्ती विसर्जनाकामी प्रशासनास सहकार्य करावे. असे आवहन केज नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

No comments