Breaking News

तुकुचीवाडीत एकावर प्राणघातक हल्ला, चोघांविरुद्ध गुन्हा दाखल


गौतम बचुटे । केज 
बैल पोळ्याच्या दिवशी गावात बैल का आणले ? या कारणा वरुन केज तालुक्यातील तुकुचीवाडीत ३५ वर्षीय इसमाला गुप्तांगाच्या नाजूक जागी धारदार चाकूने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. जखमींला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

तपासी अधिकारी पोहेकॉ बाळकृष्ण मुंडे


अधिक माहिती अशी की, दि.१९ ऑगस्ट रोजी नामदेव पंढरी चौरे वय (३५ वर्ष) यास अशोक संपती चौरे, बालासाहेब रघुनाथ चौरे, अंकुश रामराव चौरे, महिपती रघुनाथ चौरे या चौघानी त्याच्या घरा समोर जाऊन त्याला म्हणाले की, तू पोळ्याच्या दिवशी गावात तुझे बैल का आणले ? या कारणावरुन शिवीगाळ केली. त्या वेळी अशोक संपती चौरे याने गचूरे धरून चाकु काढुन मांडीवर व गुप्त भागाच्या नाजुक जागी धारदार चाकुने भोकसून गंभीर जखमी केले. अंकुश रामराव चौरे याने त्याच्या हातातील चाकु नामदेव चौरे याच्या कमरेला मारून जखमी केले आणि महिपती रघुनाथ चौरे याने लाथा बुक्क्याने मारहाण केली. तसेच तुमच्याकडे बघुन घेवु, असे म्हणत धमकी दिली. या प्रकरणी सोमवारी ( दि.२४) केज पोलिसांना एमएलसी व वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्या नंतर  नामदेव पंढरी चौरे यांच्या फिर्यादी वरून अशोक संपती चौरे, बालासाहेब रघुनाथ चौरे, अंकुश रामराव चौरे, महिपती रघुनाथ चौरे या चौघा विरुद्ध केज पोलीस स्टेशनला गु.र.नं. ३२१/२०२० भा.दं.वि. ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६ व, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळकृष्ण मुंडे तपास करीत आहेत.

No comments