Breaking News

कोरोना माहामारीच्या काळात खासगी रुणालयांकडून नागरिकांची आर्थिक लूट

प्रतिकात्मक

रुग्णांसह नातेवाईकांचा 'ना' इलाज ; शासन- प्रशासन घेतंय बघ्याची भूमिका

बीड : कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे तर दुसरीकडे सरकारी दवाखान्यातील खाटा अपुऱ्या पडत आहेत. अशातचं इलाजासाठी रुग्णांना खासगी दवाखान्यात  गेल्याशिवाय पर्याय नाही. हीच संधी साधत कोरोना माहामारीच्या काळात या रुग्णालयांकडून मोठे बील आकारून नागरिकांची आर्थिक लूट केल्या जात असल्याचे वृत्त नुकतच बीबीसी वर्ड न्यूजने दिल आहे. बीबीसीच्या या वृत्ताने खळबळ उडाली असून कोरोनाच्या माहामारीत नागिकांचा ही 'ना' इलाज झाल्याचे दिसतंय तर शासन - प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेऊ लागल्यानं संताप व्यक्त केल्या जात आहे. 


बीबीसी वर्ड न्यूजच्या वृत्तानुसार कोरोना या वैश्विक माहामारीने भारतात अक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. त्याला कारण ही तसेच देशात आरोग्य यंत्रणेचा कायम तुटवडा असतो. त्यातच कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असताना सरकारी दवाखान्यात खाटा अपुऱ्या पडत आहेत. अशातच रुग्णांना इलाजासाठी खासगी रुग्णालयात जावं लागतं आहे. किंबहुना खासगी रुग्णालयात जाण्यासाठी मजबूर केल्या जात आहे. खासगी रुग्णालय रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची कोरोना महामारीच्या काळात मोठं बिल आकारून आर्थिक लूट चालवली जात आहे. 
 हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात तीन दिवसांचे बील ३. ५० लाख आकारण्यात आले आहे. शिवाय एवढे पैसे घेऊन ही रुगणांवर काय उपचार करण्यात येत आहेत किंवा त्याबाबत कसलीही माहिती नातेवाईकांना दिली जात नसून आवर्जून बील मात्र सांगितले जाते. हा प्रकार हैदराबाद मध्येच नाहीतर महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यात ही असाच प्रकार सुरू आहे. कोरोना माहामारीच्या काळात विदेशात तेथील नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी प्रामाणिक पणे प्रयत्न केले जातायेत. परंतु इथे महामारीचा धंदा चालवला जात असून याकडं सरकार निमूटपणे पाहतांना दिसत आहे. अशी हताश चर्चा आता रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये होत आहे.

1 comment: