Breaking News

केज येथे पोलीसांचे पथसंचलन

गौतम बचुटे । केज 
कोरोना विषाणू आणि त्याच्यामुळे सुरू असलेल्या लॉक डाउन व संचारबंदी सुरू असून गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आज दि. २९ ऑगस्ट २०२०, शनिवार रोजी केज पोलीसानी मुख्य रस्त्यावरून पथसंचलन केले.
यात पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, पोलीस निरीक्षक श्रीराम कांबळे, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक अर्चना भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक इनामदार, महादेव गुजर, कादरी, सर्व पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान हे सर्वजण सहभागी झाले होते. पथसंचना दरम्यान पोलीसांनी गुन्हेगारी प्रवृत्ती आणि असामाजिक शक्तींना आळा बसावा आणि पोलीसांची शस्त्र सज्जता पाहून उरात धडकी भरण्यासाठी शस्त्र सज्जतेचेही प्रदर्शन केले.

No comments