Breaking News

केज कडकडीत बंद : पेट्रोल पंपासह सर्व व्यवहार बंद : रस्त्यावर फक्त पोलीस


गौतम बचुटे । केज
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आज पहिल्या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला. बीड जिल्ह्यातील बीड, आष्टी, माजलगाव, अंबाजोगाई, परळी आणि केज या शहरात वाढत असलेला कोरोना विषाणूचा प्रभाव आणि वाढती रुग्ण संख्या यामुळे जिल्हाधिकारी राहुल रेखावार
यांनी दि. १२ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट या दहा दिवसाच्या कालावधीत सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देत साथरोग प्रतिबंधक कायदा आणि संचार बंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी केज येथील मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ, मोंढा, शिवाजी चौक, भगवान बाबा चौक, कानडी रोड, भवानी चौक, बस स्टँड परिसर, सोनार गल्ली, टेलर गल्ली, विश्राम गृहा समोरील परिसर, कळंब रोड आणि मुख्य महामार्गावरील व शहरातील सर्व दुकाने, बाजार पेठ व सर्व व्यवहार बंद आहेत. तसेच रस्त्यावर  वाहनांची वर्दळ कमी व्हावी या उद्देशाने इंधन पंप ही बंद ठेवण्यात आलेले आहेत. तर अवघी दवखान्याशी संलग्न मेडिकल स्टोअर्स वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. रस्त्यावर केवळ पोलीस कर्मचारी, महसूल व नगर परिषद कर्मचारी आणि त्यांना सहाय्य करणारे कर्मचारी हे दिसून येत होते.

No comments