Breaking News

कोरोनाने मृत्यू झाल्यास कुटुंबाला दहा लाखाची तत्काळ आर्थिक मदत जाहीर करा - बसपा जिल्हा प्रभारी सतीश कापसेबीड : कोरोना जागतीक महामारी ने संपूर्ण देशात व महाराष्ट्र राज्यात मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. चीन या देशातुन या संसर्गजन्य रोगाचा प्रसार संपुर्ण जगातील प्रत्येक नागरिकांच्या पर्यत पोहचला आहे. 

जागतीक महामारी हे संपुर्ण जगातील मानवी जीवनातील अत्यंत मोठी जिवीतहानी आहे. या संकटात कोरोनामुळे  कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यु झाल्यास कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे तसेच लाॅकडाऊन असल्याने रोजगार नाही. आख्खे कुटुंब व्यवस्था या रोगाला बळी पडत आहे. सरकारने  वेळीच  योग्य  उपाय योजना केल्या  नाहीत  त्यामुळे  अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सरकारने या मारामारीच्या काळात प्रत्येक नागरिकांच्या जिवीतहानी चा किमान दहा लाखाचा विमा काढावा तसेच कोरोना ने मृत्यू झाल्यास मयत कुटुंबा च्या वारसदाराला तत्काळ दहा लाख रुपये आर्थिक मदत जाहीर करावी  अशी मागणी बहुजन समाज पार्टी च्या वतीने बसपा जिल्हा प्रभारी सतीश कापसे बीड यांनी प्रसिध्दी पञकाद्वारे  केली आहे.

No comments