Breaking News

शाळकरी मुलीला तरुणानं नेलं पळवून


 वडवणी पोलिसात गुन्हा दाखल

बीड : एका शाळकरी मुलीला गावातील तरुणाने फूस लावून पळवून नेल्याची घटना वडवणी तालुक्यातील रुई पिंपळा येथे घडली असून आरोपी तरुणा विरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील रुई पिंपळा येथील पंधरा वर्षीय मुलीस गावातील 
सत्यप्रेम वैजनाथ आंधळे (वय २२ ) या तरुणाने फूस लावून पळवून नेले. दरम्यान याप्रकरणी पीडित मुलीच्या पित्याच्या तक्रावरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि. जे. एम. परदेशी करत आहेत.

No comments