Breaking News

गणेश मंडळांच्या परवानगीसाठी बीड जिल्हातील पोलीस ठाण्यात एक खिडकी पध्दती

बीड : जिल्हयातील सर्व गणेश मंडळ यांचे अर्ज स्विकारुन परवानगी देण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशन येथे एक खिडकी पध्दती संबंधित विविध विभागांच्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती   अंतर्गत करण्यात येवून तेथूनच परवानगी देण्यात येणार असून इतर ठिकाणाहून परवानगी देण्यात येवू नये.

यासाठी प्रत्येक अर्जदार यांनी प्रत्येक विभागाकडे वेगळे अर्ज करण्याची आवश्यकता नाही, केवळ एकच अर्ज एक खिडकी पध्दती अंतर्गत पोलीस स्टेशन येथे करावा.
श्रीगणेशाची प्रतिष्ठापणा होणार असून बीड जिल्हयातील सर्व गणेश मंडळ यांना पोलीस विभाग, नगर परिषद, पंचायत, ग्रामपंचायत, विद्युत विभाग, सह.आयुक्त अन्न व औषध प्रशासन, सा.बा.विभाग ई.विभागांची परवानगी घेणे आवश्यक असल्याने सदर  आदेश अपर जिल्हादंडाधिकारी प्रवीण कुमार धरमकर यांनी दिले आहेत .

No comments