Breaking News

बीडमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन विविध उपक्रमांनी साजरा


बीड :  राष्ट्रीय क्रीडा दिन " हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट रोजी विविध उपक्रमांनी महाराष्ट्र शासना  च्या शालेय शिक्षण व क क्रीडा विभागांतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्या अधिनस्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय  तथा जिल्हा क्रीडा परिषद,  बीड  मार्फत साजरा करण्यात आला.


 यावेळी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी माननीय प्राध्यापक जेपी शेळके, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे,  बीड जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष प्रा.  दिनकर थोरात,  बीड जिल्हा हॉकी संघटनेच्या उपाध्यक्षा डॉ.  कविता गीते (कराड ),  राज्य युवा पुरस्कारार्थी  तत्वशिल कांबळे,   क्रीडा संघटक शरद आंदुरे,  क्रीडा संघटक विनायक वझे, क्रीडा संघटक उद्धव कराड, क्रीडा संघटक रामदास गिरी जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थि  तथा क्रीडा संघटक  डॉ.  अविनाश बारगजे, जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी तथा क्रीडा संघटक  प्रा तानाजी आगळे यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
                                         कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथींच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला. सदर प्रसंगी गुगल मीट या वेबव्दारे  मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर व खेळावर    प्राध्यापक जे पी शेळके,   प्राध्यापक दिनकर थोरात, तत्वशिल कांबळे, डॉ.  कविता गीते (कराड),  विनायक वझे यांनी मार्गदर्शन केले.    
          प्राध्यापक जेपी शेळके यांनी  मेजर ध्यानचंद यांच्या विषयी त्यांचा हॉकी या खेळातील खडतर जीवन प्रवास  व त्यांनी राष्ट्रासाठी केलेली महान कामगिरी यावर प्रकाश टाकला .  खेळासाठी सुविधा उपलब्ध नाहीत म्हणून रडत न बसता विद्यार्थ्यांनी मेजर ध्यानचंद यांचा आदर्श समोर ठेवून खेळात आपली कामगिरी दाखवावी असे आव्हान शेळके सर यांनी केले.  तसेच  क्रीडा संकुलात मेजर ध्यानचंद यांचा पुतळा विद्यार्थ्यांना एक आदर्श समोर ठेवावा म्हणून बसवण्यात यावा ही मागणीही प्राध्यापक शेळके, प्रा दिनकर थोरात ,  विनायक वझे यांनी याप्रसंगी केली.
                        सदर प्रसंगी क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील हॉकी खेळात राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतलेल्या महिला हॉकी खेळाडू  उस्वाते हुस्ना शेख नजीर या खेळाडूचा व आंतरराष्ट्रीय खोखो स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविलेल्या तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे यांचा प्रातनिधीक   स्वरूपामध्ये प्रमुख अतिथींच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले तर आभार श्रीमती सुप्रिया गाढवे यांनी मानले .     
              कार्यक्रमा नंतर बीड जिल्हा सायकलिंग असोसिएशनच्या सहकार्याने " सायकल रॅली "  " फिट इंडिया फ्रीडम रण " या उपक्रमाचा शुभारंभ प्रमुख अतिथींच्या  शुभ हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला .  कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना करिता जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली धनेश करांडे ,  गोवर्धन पवार , विजय जाहेर , कल्यान काळे , सचिन जाधव ,  किशोर काळे , शेख नजीर यांनी परिश्रम घेतले

1 comment: