Breaking News

केजमध्ये अँटिजेन तपासणीत २० व्यापारी बाधीत


तीन केंद्रेवर - एक फिरत्या पथकाने : दुपार पर्यंत केल्या ६८४ टेस्ट

गौतम बचुटे । केज  

केज येथे मा. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशा नुसार वाढता संसर्ग रोखण्यासाठी लोकांशी संपर्कात येणारे विविध प्रकारच्या सेवा सुविधा पुरविणारे व्यापारी आणि दुकानदार हे लोकांच्या जास्त संपर्कात येतात. त्यांच्या कडून जास्त कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहेत. केज येथील सररस्वती विद्यालय, वसंत महाविद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि एक फिरते पथक यांच्या मार्फत या तपासण्या सुरू आहेत. दरम्यान आज ६८४ व्यापाऱ्यांच्या तपासण्या पूर्ण झाल्या. त्यापैकी २० जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. त्या  संशयित २० जणांना उपचारासाठी केज येथील कोरोना उपचार केंद्र पिसेगाव येथे हलविण्यात आले आहे.

केज येथे व्यापारी वर्गातील सलून- (१०५), हातगाडे- (३५), मंगळवार पेठ छोटे व्यापारी- (२५), चिकन सेंटर- (३३), सराफा संघटना- (७०), ऑटोमोबाईल्स- (२५), फर्निचर (४८), भांडी- (१७), पेट्रोल पंप- ( ३५) कापड दुकानदार- (१४०), बँक कर्मचारी- (८५) अशा एकूण ६२९ जणांच्या नोंदी करण्यात आल्या होत्या. आज केज येथील तीन केंद्र आणि एका फिरते पथक यांच्या द्वारे एकूण ६८४ जणांच्या तपासण्या पूर्ण झाल्या. त्यापैकी २० अहवाल हे पॉजिटीव्ह आल्याची विश्वासनिय माहिती आहे.
या सर्व केंद्रावर तपासण्या सुरू असताना नायब तहसीलदार सचिन देशपांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन व मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी भेटी देऊन संनियंत्रण ठेवले.

दरम्यान सरस्वती विद्यालयाच्या तपासणी केंद्रावर पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन आणि गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे यांनीही तपासणी करून घेतली.

No comments