Breaking News

केज तालुक्यातील अवैद्य वाळू उपशा विरुद्ध आवाज उठविणाऱ्या प्रताप दातार यांची पोलीस संरक्षणाची मागणी

दोन दिवसांपूर्वी वाळू माफियांच्या हस्तकांनी रिव्हॉल्व्हर रोखल्याची केली होती तक्रार

गौतम बचुटे । केज :
 तालुक्यातील आरणगाव येथील बोभाटी नदी पात्रातून अवैद्य वाळू उपसा प्रकरणी आवाज उठविलेल्या प्रदीप दातार यांनी वाळू माफियांच्या हस्तकांनी त्याच्यावर रिव्हॉल्व्हर रोखल्याची तक्रार केज पोलिसांत दिली होती. त्या प्रताप दातार याने आपल्या जिवीताला धोका असून मला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केज पोलीसांकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील अवैद्य वाळू उपसा आणि वाहतूकी विरुद्ध बेलगाव येथील प्रताप दातार याने वाळू प्रकरणाशी संबंधित तहसीलदार व नायब तहासिलदार यांच्यावर कार्यवाही झाली नाही; तर १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्या नंतर त्याला वाळू माफिया आणि त्या अवैद्य वाळू व्यवसायाशी संबंधितांनी तो मस्साजोग येथून गावाकडे जात असताना त्याला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जीवे मारण्याची घमकी दिली. अशी तक्रार केज पोलीस स्टेशनला दाखल केली होती. त्या नुसार केज पोलीस स्टेशनला एका वकीलासह ओळखीचे तीन व अन्य तीन अनोळखी अशा सहा जणांच्या विरोधात गु.र.न. ३०७ /२०२० भा.दं.वि. ३४१, ५०४, ५०६, ३४ सह शस्त्र प्रतिबंधक कायद्याचे कलम ३/२५ प्रमाणे गुहा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे करीत आहेत.
दरम्यान दि.१३ ऑगस्ट रोजी प्रताप दातार याने केज पोलिसांना एक निवेदन दिले असून त्याने माझ्या व कुटुंबाच्या जिवीताला वाळू माफियापासून धोका संभवत असल्याने पोलीस संरक्षणाची मागणी केली केली आहे. तसेच निवेदनात त्याने त्याचे घर हे गावापासून दूर व बोभाटी नदी पात्राच्या पैलतीरी असल्यामुळे जास्त धोका संभवतो. असेही प्रताप दातार याने निवेदनात म्हटले आहे.
यावर आता प्रशासनाकडून अवैद्य वाळू उपसा संदर्भात काय कार्यवाही होणार ? 

No comments