Breaking News

गणेशोत्सवासाठी परवानगी द्या; जिल्हाधिकाऱ्यांकडे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची निवेदनाद्वारे मागणी

बीड : गणेशोत्सव हा सण साजरा करण्याची बीड शहरात परंपरा आहे.  मात्र कोरोना काळात या सणावर काही बंधने आहेत. तरीही नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली.

बीड शहरात गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सव साजरा करण्यासाठी अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे दिनांक २२ रोजी नियमांचे काटेकोरपणे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली. उत्सव साजरा करण्यासाठी अनेक मंडळांनी मागणी केली आहे. त्यामुळे कोरोना विषयक नियमांचे पालन करून त्यांना परवानगी दिल्यास गणेशोत्सव साजरा करता येईल,असेही निवेदनात डॉ. क्षीरसागर यांनी म्हटले आहे. यावेळी अरुण डाके, ऍड.राजेंद्र राऊत उपस्थित होते.

1 comment: