Breaking News

या चिखलाच्या रस्त्याला वाली कोण ? : पायी चालता येईना तर दुचाकीची गत काय..!चिखलाने माखलेल्या रस्त्याचे सोशल मिडियावर फोटो टाकून अनेकांनी मांडली व्यथा  !
गौतम बचुटे । केज  
केज तालुक्यातील साळेगाव येथील बस स्टँड पासून पूर्वेला असलेल्या नागझरी वस्तीकडे जाणारा रस्ता हा पूर्णतः चिखलमय आणि निसरडा झाला असून या रस्त्याने साधे पायी चालणे सुद्धा अवघड झाले असून दुचाकीवरून जाणे म्हणजे एक दिव्यच आहे. मात्र या कडे कुणाचेच लक्ष नाही. या रस्त्याने ये-जा करणाऱ्या अनेकांनी सोशल मिडियावर फोटो अपलोड करून आपली समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसिद्दी माध्यमात आमचे नाव नको. अशी देखील भीतीयुक्त विनंती केली आहे.

साळेगाव ता केज येथील बस स्टँड च्या पूर्व दिशेला नागझरीवस्ती आणि सभोवताली सुमारे २०० लोक संख्येची नागरी वस्ती आहे. मात्र या वस्तीला जाणारा पक्का रस्ता नसल्यामुळे या वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना पूर्ण पावसाळा हा चिखल आणि पाण्यातून चालावे लागते. रस्त्यावर पावसाच्या पाण्या बरोबरच नालीचे सांडपाणीही वाहून येत असून दोन्ही बाजूने अतिक्रमणे देखील काढलेली आहेत. 

या रस्त्याने पायी सुद्धा नीट चालता येत नाही तसेच महिला लहान मुले व वृद्ध नागरिकांची तर खूपच अडचण आहे तसेच या दुचाकी चालविणे म्हणचे एक दिव्यच आहे. याच रस्त्याने पुढे लोखंडे वस्ती देखील जोडली गेली आहे. तसेच हा रस्ता राज्य शासनाचा की, जिल्हा परिषदेचा? याचा देखील संभ्रम आहे. 
हा रस्ता एवढा खराब आणि चालता सुद्धा येत नसताना या रस्त्याने वागणाऱ्या लोकांनी स्थानिक प्रशासना विरुद्ध आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. तसेच सोशल मीडियावर फोटो देखील अपलोड केले आहेत. मात्र प्रसिद्धी माध्यमात आमच्या नावांचा उल्लेख करू नये. अशी भीतीयुक्त विनंती केली आहे. त्यामुळे या वस्तीतील भित्रे नागरिक हे त्यांच्या मूलभूत हक्कासाठी एकत्र येऊन लोकशाही मार्गाने आंदोलन केल्या शिवाय त्यांची मागणी पूर्ण होणार नाही.

मागील काही वर्षा पूर्वी या साळेगाव बस स्टँड ते लोखंडे वस्ती अशा सुमारे २.५ किमी रस्त्याचे मुरुमाचा भराव टाकण्याचे काम काही अंशी झाले होते. परंतु  नंतर हा रस्ता पूर्ण होऊ शकला नाही.

No comments