Breaking News

मुलगा बाहेर पडताच तो शिरायचा घरात, अन सुनेसोबत करायचा दुष्कर्म...

गौतम बचुटे । केज
लग्न झाल्यानंतर काही महिन्यातच त्या नराधमांची नजर तिच्या कोवळ्या शरीरावर पडली. नात्यानं सासरा पण बापा समान असलेल्या त्या वासनांध गिधाडानं तिच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले. घटना केज तालुक्यातील एका गावात घडलीय. मुलगा बाहेर जाताच हा घरात शिरायचा आणि तिच्या सोबत दुष्कर्म करायाचा. दिवसेंदिवस वाढलेला त्रास पाहून त्या माऊलीनं अखेर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर नराधम आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


    नात्याला काळिमा फासणारी ही घटना केज तालुक्यातील एका गावात घडली आहे. पीडित सुनेचं लग्न झाल्यापासूनच चुलत सासरा सतीश प्रभू चंदनशिव वाईट हेतूने पाहत होता. काहीही निमित्त करून तो घरी यायचा. दरम्यान घरातील सुनेच्या मोबाईल मधून त्याने स्वतःच्या मोबाईल वर मिस्ड कॉल देऊन नंबर घेतला. तो दररोज फोन करून माझ्याशी लग्न कर असा तगादा लावायचा. एके दिवशी मुलगा घरी नसल्याचा कानोसा घेऊन तो घरात शिरला अन मुलीसमान सुनेवर बलात्कार केला. घडलेल्या घटनेची वाछता केल्यास पतीला जिवंत मारण्याची धमकी दिली. धमकीला घाबरून पीडितेने याविषयी ब्र देखील काढला नाही. काही दिवसांनंतर तो कधीही येऊन तिच्या शरीराचे लचके तोडू लागला. हा त्रास असाह्य झाल्याने आपल्या पतीसोबत केज पोलीस ठाणे गाठून तिच्यासोबत घडलेली कैफियत मांडली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची कारवाई  पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, राजू गुंजाळ यांनी केली आहे. 

1 comment: