Breaking News

आष्टी शहरातील जनतेने रॅपिड अँटीजन टेस्ट करून घ्यावी - आमदार बाळासाहेब आजबे

के. के.  निकाळजे । आष्टी

     आष्टी तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आष्टी व कडा शहरातील व्यापारी, किरकोळ विक्रेते ,भाजी फळ विक्रेते, दूध विक्रेते, बँक कर्मचारी, किराणा दुकानदार, कर्मचारी, पोलीस, पत्रकार व दैनंदिन जास्त लोकांच्या संपर्कातील व्यक्तींनी दिनांक 18, 19 व 20 ऑगस्ट 2020 रोजी आपली रॅपिड अँटीजन टेस्ट  करून घ्यावी असे आवाहन आमदार बाळासाहेब आजबे यांनी सर्व नागरिकांना केले आहे.

       जिल्हा परिषद बीड आरोग्य विभागाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी व  मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार आष्टी तहसीलदार व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली covid-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आष्टी  शहरांमध्ये रॅपिड एंटीजन टेस्ट मोहीम 18 ऑगस्ट पासून सुरू करण्यात येत आहे ,शहरातील व्यापारी, दुकानात काम करणारे कामगार, छोटे-मोठे सर्व व्यवसायिक, दूध विक्रेते, पेट्रोल पंपावर काम करणारे कामगार, गर्दीच्या ठिकाणी काम करणारे सर्व व्यवसायिक व कँटोन्मेंट झोन मधील नगरपंचायत  व ग्रामपंचायत प्रशासनाने तयार केलेल्या यादीनुसार सर्वांनी आपली रॅपिड  अँटीजन टेस्ट आष्टी तहसील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या नियोजनाप्रमाणे करून घ्यावी ,आष्टी शहरातील  डॉक्टर,नगरसेवक ,आरोग्य सेवक,  कोविड योद्धा ,सामाजिक संस्थेचे  सदस्य यांनी ही अँटीजन टेस्ट  यशस्वी करण्यासाठी  प्रशासनाला  सहकार्य करावे म्हणजे आपल्याला covid-19 चा संसर्ग रोखण्यासाठी मदत होईल व जे कोणी पॉझिटिव्ह असतील त्यांच्यावर योग्य उपचार करता येतील, आष्टी ,कडा शहरातील जनतेने आज पर्यंत प्रशासनाला चांगल्या प्रकारे सहकार्य केले आहे यापुढेही प्रशासनाला व जनतेला असेच सहकार्य करीत राहावे म्हणजे आपण कोरोनाला हरवण्यात नक्कीच यशस्वी होऊ ,कोरोना पासून बचाव करण्यासाठी सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी विनाकारण धाडस न करता सर्व प्रकारची काळजी घेऊनच आपण बाहेर पडले पाहिजे , प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळून जनतेने सहकार्य करावे असे आवाहनही आमदार बाळासाहेब आजबे यांनी केले आहे.

No comments