Breaking News

रिलायन्सच्या तंत्रज्ञानचा वापर : ६ एकारात कौडगावचे शेतकरी पांडूरंग फुके यांनी मिळवलं तब्बल ३ लाखाच उत्पन्न

पारंपरिक शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा केला वापर

बीड : हता-तोंडाशी आलेला घास मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या  कधी अस्मानी तर सुलतानी संकटाने हिरावून घेतला जातो. त्यातच ओला आणि सुकाच्या दुष्ट चक्रात अडकलेला येथील बळीराजा कायम आर्थिक विवंचनेत असतो. परंतू, यावर बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील  कौडगाव घोडा येथील एका शेतकऱ्यानं मात केलीय. रिलायन्सच्या तंत्रज्ञानाचा वापर करीत ६ एकारात कापूस व सोयाबीन पिकांचं भरघोस उत्पादन काढून तब्बल ३ लाख रुपयांचं उत्पन्न  मिळवलंय. परळी तालुक्यातील  कौडगाव घोडा येथील शेतकरी पांडूरंग फुके यांची यशोगाथा..!

मोठ्या प्रमाणावर होणारा रासायनिक खतांचा वापर, तणनाशके, कीटकनाशके यांची गरज नसतांना होणारी फवारणी, कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ अशा एक ना अनेक समस्यांनी शेतकरी नेहमी अडचणीमध्ये असतो. त्यात मराठवड्यातील बीड जिल्ह्यात तर अशा परिस्थितीला कंटाळून बर्‍याच शेतकऱ्यांनी प्रसंगी आत्महत्या केल्या आहेत.  पण अशा परिस्थितीतही काही शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून योग्य प्रकारे शेती पद्धत अवलंबून भरगोस उत्पन्न मिळवत आहेत.  यातीलच एक शेतकरी परळी तालुक्यातील कौडगाव घोडा येथील शेतकरी  पांडुरंग फुके यांना ६ एकर शेती आहे. त्यांच्या शेतालगतचं कालवा आहे. त्यामुळे शेतीसाठी त्यांना मुबलक पाणी आहे. परंतु योग्य प्रकारचे ज्ञान व शेती करण्याची त्यांची पारंपरिक पद्धत असल्यामुळे त्यांचा शेतीवरील उत्पादन खर्च हा खूप जास्त होत होता व उत्पन्न कमी होत होते. आशातचं २ वर्षापूर्वी त्यांचा मोबाइल क्रमांक रिलायन्स फाउंडेशनच्या व्हाट्सअप्प ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आला. ज्यामध्ये त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची बरीच माहिती त्यामधून मिळत गेली. तसेच शेतीमधील विविध शास्त्रोक्त पद्धती, खत व्यवस्थापन, कीड,  रोग व्यवस्थापन याच्या विषयी माहिती त्यांना तज्ञांकडून मिळत गेली. होऊ लागला.  तसेच या ग्रुपमध्ये इतरही चांगले शेतकरी आहेत ज्यांच्या अनुभवाचा फायदा  शेतकर्‍यांना होत आहे. पांडुरंग फुके यांनी मागील वर्षी कापूस व सोयाबीन या पिकांचे भरगोस उत्पन्न घेतले. पांडुरंग फुके यांना ४ एकरात कापूस पिकामध्ये ३५ क्विंटल कपाशीचे  उत्पन्न झाले. त्यांच्या कापसाला ५ हजार चारशे रुपये प्रती क्विंटल असा भाव मिळाला असून कापूस विक्रीतुन त्यांना एकूण १ लाख ८९ हजार रुपये मिळाले. त्यांना कपाशीच्या पिकासाठी एकूण ७० हजार रुपये एवढा खर्च झाला. खर्च वजा जाता त्यांना १ लाख १९ हजार एवढा निव्वळ नफा मिळाला.  तसेच त्यांनी २ एकरमध्ये सोयाबीन पीक घेतले होते ज्यामध्ये त्यांना १५ क्विंटल सोयबीनचे उत्पन्न झाले व त्याला ३ हजार पाचशे रुपये एवढा भाव मिळाला असून सोयाबीन विक्रीतुन त्यांना ५२ हजार ५०० रुपये मिळाले आहे. सोयाबीन साठी त्यांना एकूण २० हजार रुपये एवढा खर्च आला आहे. यामधून खर्च वजा जाता त्यांना ३२ हजार ५०० रुपये निव्वळ नफा मिळाला. तसेच या पिकांमध्ये त्यांनी अंतर पीक म्हणून तूरीचे उत्पादन घेतले. त्यामुळे कपासी, सोयाबीन व तूर असे  मिळून एकूण २ लाख रुपये एवढा निव्वळ नफा त्यांना मिळाला.

"शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक"
 रिलायन्स फाउंडेशनमुळे माझ्या ६ एकर शेतात पारंपरिक शेती पद्धतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आज भरघोस उत्पादन व उत्पन्न मिळवत आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे खूपच आवश्यक आहे. त्यामुळे पैशाची बचत तर होतेच, शिवाय शेतीतील उत्पन्न सुद्धा वाढते. असं शेतकरी पांडूरंग फुके यांनी सांगत रिलायन्स फाउंडेशन द्वारे मिळणार्‍या महितीमुळे आज मी समाधानी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.  

No comments