Breaking News

साळेगाव अनिश्चित काळासाठी बंद


गौतम बचुटे | केज :
साळेगाव ता.केज येथे दोन कोरोना संसर्गित रुग्ण आढळून आल्याने अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आले आहे.

साळेगाव ता. केज येथील दोन रुग्ण हे कृषि सेवा केंद्रातील कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे तेही त्यांचे सहवासीत असल्याने ते दोघे संसर्ग बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग इतरत्र वाढू नये म्हणून मा. जिल्हाधिकारी बीड यांनी एका आदेशान्वये साळेगाव हे कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले आहे. त्या नुसार अत्याश्यक सेवा वगळता साळेगाव येथील सर्व व्यवहार हे अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आले आहेत.

No comments