Breaking News

शेतकरी कामगार पक्षाचे केज तहसीलसमोर अन्नत्याग आंदोलन


गौतम बचुटे । केज
शेतकर्यांच्या विविध प्रश्नासाठी केज तहसील कार्यालया समोर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.

बीड जिल्ह्यामध्ये पिक कर्ज संदर्भात कागदपत्र च्या नावाखाली आवश्यक कागदपत्र मागून शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणामध्ये मानसिक आर्थिक पिळवणूक केली जात आहे. बँकांनी शेतकऱ्यांना कोरोनाच्या महामारीत शेतकऱ्याची होणारी अडवणूक थांबावी. यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाभर भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे.
आंदोलकांच्या पुढील प्रमाणे मागण्या आहेत. बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक न करता तात्काळ पीक कर्ज वाटप करावे. मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होऊनही कर्जमाफी  मिळाली नाही. अशा शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी देऊन त्यांना पीक कर्ज वाटप करावे. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सोसायटी मार्फत शेतकऱ्यांना कर्ज तात्काळ विना अट वाटप सुरू करावे. दुबार पेरणीची वेळ आलेल्या व फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना बि- बीयाणे कंपनीकडून शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी भरपाई देण्यात यावी. वयोवृद्ध शेतकऱ्यांना देखील पीक कर्ज वाटप करावे. कुटुंबातील एकत्र क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील कर्ज बँकांनी द्यावे. वीज वितरण कंपनीने    लॉकडाउन काळातील चार महिन्याचे वीज बिल माफ करून वाढीव वीज बिल दुरुस्त करून द्यावेत. या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने केज तहसील कार्यालया समोर आन्नत्याग करण्यात आले.

तसेच शेतकऱ्याची बँके कडून होणारी अडवणूक नाही थांबली तर संबंधित बँकेला टाळे ठोकण्यात येईल आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यार आला आहे. या आंदोलनात
भाई अशोक रोडे, मंगेश देशमुख, बाबाराजे गायकवाड, विशाल मुळे, जे. डी. देशमुख, राज तपसे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

No comments