Breaking News

फुले-आंबेडकरी अभ्यासक इंजि. भगवान साकसमुद्रे यांच्यावरील हल्ल्याचा विविध संघटनांकडून निषेध

परळी वै. : सुप्रसिद्ध फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर दिनांक ६ ऑगस्ट रोजी झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा विविध सामाजिक संघटनांकडून निषेध व्यक्त होत आहे.व आरोपींना अद्याप अटक न झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

सविस्तर वृत्त असे की, भारतीय बौद्ध महासभा,रिपाइं स्वाभिमानी, बसपा, बहुजन विकास मोर्चा, संत रविदास प्रतिष्ठान, फुले-आंबेडकरी अभ्यास समूह, परळीचे पत्रकार संघ, कुरेशी युवा मंच आदी सामाजिक, राजकीय, धार्मिक संघटना च्या वतीने परिपत्रकांद्वारे इंजि. भगवान साकसमुद्रे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. भगवान साकसमुद्रे हे फुले-आंबेडकरी विचारधारेचे प्रचारक आहेत तसेच मुक्त पत्रकार असून ते नेहमी सामाजिक एकोपा निर्माण व्हावा यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. त्यांची जाती-धर्माच्या लोकांमध्ये एक वेगळी ओळख आहे. परंतु त्यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोरांना अद्याप ही अटक करण्यात आली नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी भगवान साकसमुद्रे यांच्या तब्येतीची मोबाईल द्वारे विचारपूस केली.
   दरम्यान इंजि.भगवान साकसमुद्रे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक बीड यांच्याकडे आपल्या जीवीतास धोका असल्या कारणाने पोलीस संरक्षण द्यावे  अशी मागणी त्यांनी केली आहे. यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे प्रदेश अध्यक्ष दिनेश हनुवते, रिपाइं स्वाभिमानी चे विजयदादा साळवे, बसपाचे परळी विधानसभा अध्यक्ष ऍड. बी.डी.उजगरे, संत रविदास प्रतिष्ठान तुळशीराम वाघमारे, राष्ट्रीय चर्मकार महा संघ ता अ  शिवाजी घायल ,ज्येष्ठ पत्रकार रानबा गायकवाड, दैनिक सकाळचे प्रतिनिधी प्रवीण फुटके, दै.म.साथीचे दत्तात्रय काळे, संभाजी मुंडे, दै.गावकरीचे जगदीश शिंदे, दै.महाभारतचे विकास वाघमारे, दै.युवा सोबतीचे महादू शिंदे, राष्ट्रवादी युवा नेते बापू गायकवाड, संजय पाडमुखे, देवराव लुगडे पाटील, फुले-आंबेडकरी अभ्यास समूहचे सचिन वंजारे, कुरेशी युवा मंच चे कबीर कुरेशी आदींनी निषेध व्यक्त केला आहे.

No comments