Breaking News

कोरोना लढ्यात यश येवो धनंजय मुंडेंची प्रार्थना..!

सार्वजनिक गणेशोत्सव वगळता घरोघरात श्रींची प्राणप्रतिष्ठा उत्साहात

बीड : दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून बीड जिल्ह्यात  सार्वजनिक गणेशोत्सवांना परवानगी नाकारल्यामुळे अनेक गणेश भक्तांच्या आनंदात विरजण पडलीय. मात्र पहिल्यांदाच यंदा ग्रामीण भागातील घरोघरी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे.  आज सकाळपासूनच बाल- वृद्धांसह गणेश भक्तांनी शहरात मोठी गर्दी केली होती.  पावसाने उघाड दिल्याने गणेश भक्तांना बाप्पाना घरी नेण्यास सोपस्कर  झाले. बऱ्याच गावात एक गाव एक गणपतीची संकल्पना राबविण्यात आली आहे. 

पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या घरी श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा..!
 देशभरात आज आपल्या लाडक्या गणेशाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.  बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी येथील निवास्थानी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. कोरोनाच्या लढ्यात सर्वांना यश येवो, असं साकडं घालत मुंडे यांनी श्री गणेशाची आरती केली.
No comments