Breaking News

नाभिक विद्यार्थी सेनेच्या बीड शहराध्यक्षपदी तुषार दोडके


बीड :  राष्ट्रीय नाभिक राष्ट्रीय सेनेचे अध्यक्ष अण्णा बिडवे यांनी विद्यार्थी सेनेच्या बीड शहर अध्यक्षपदी तुषार दोडके यांची निवड केली असून दोडके यांना नियुक्तीपत्र देऊन त्याचं अभिनंदन केलं आहे. 
बीड शहरातील तुषार दोडके नेहमीच
विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करतात. तसेच सामाजिक कार्यात ही तत्पर असलेल्या तुषार दोडके यांच्या कार्याची राष्ट्रीय नाभिक राष्ट्रीय सेनेचे अध्यक्ष अण्णा बिडवे यांनी दखल घेऊन तुषार दोडके यांची राष्ट्रीय नाभिक विद्यार्थी सेनेच्या बीड शहर अध्यक्ष पदी त्यांची निवड करून श्री. बिडवे यांच्या हस्ते तुषार दोडके यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. तुषार दोडके यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय नाभिक सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष विक्रम बप्पा बिडवे, नाभिक विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष ॠषिकेश शिंदे यांच्यासह आदींनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. 

No comments