Breaking News

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशाला प्रकल्प संचालक जि.ग्रा.वि.यं.बीड व गटविकास अधिकारी पं.स.बीड यांच्याकडून केराची टोपली...!

 रमाई आवास घरकुल योजना सन २०१९-२० मधील बीड तालुक्यासाठी १४९२ घरकुलास मंजुरी देऊन ३ महिने उलटले तरीही अद्यापपर्यंत घरकुल ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया नाही
बीड  :- पुरोगामी महाराष्ट्र शासनाने सन २०१०-११ या आर्थिक वर्षापासून अनुसूचित जातीतील ग्रामीण भागातील ज्यांना कुडाची घरे/कच्ची घरे/जे की बेघर आहेत अशा लाभार्थ्यांसाठी रमाई आवास घरकुल योजना सुरू केलेली आहे.सदर योजनेमुळे ग्रामीण भागातील अनुसूचित जातींच्या लोकांना पक्के घरे उपलब्ध होऊ लागली असून कुटुंबासाठी घराचे स्वप्न पूर्ण होऊ लागले आहेत.
सन २०१९-२० या आर्थिक वर्षात बीड पंचायत समिती या कार्यालयाकडून समाजकल्याण विभागास रमाई आवास योजनेअंतर्गत रीतसर घरकुलाचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते त्याची नियमानुसार समाज कल्याण विभागाकडून छाननी होऊन बीड तालुक्यासाठी एकूण १४९२ घरकुल प्रस्तावास मार्च २०२० मध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे, परंतु मंजुरी देऊन ४ महिन्यांचा कालावधी लोटलेला आहे.समाजकल्याण विभागाने रितसर आदेश देऊनही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा बीड व पंचायत समिती बीड या कार्यालयाने सदर घरकुलांची ऑनलाईन नोंदणी जाणीवपूर्वक केलेली नाही,शिवाय पंचायत समिती बीड कार्यालयाने एकाही घरकुलाचे आजपर्यंत मार्कआऊट टाकलेले नाही.
   बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय धनंजय मुंडे हे समाजकल्याण खात्याचे कॅबिनेट मंत्री असून त्यांनी कोरोना काळात शासनाकडे आर्थिक तरतूद उपलब्ध नसतानाही स्वतः पुढाकार घेऊन बीड तालुक्यासाठी भरीव तरतूद उपलब्ध करून एकूण १४९२घरकुलास मंजुरी प्रदान केली आहे.त्याचा फायदा ग्रामीण भागातील अनुसूचित जातींच्या गोरगरीब लाभार्थ्यांस होण्याऐवजी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा बीड व चे प्रकल्प संचालक व पंचायत समिती बीडचे गटविकास अधिकारी हे जाणीवपूर्वक लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करणे व घरकुलाची मार्कआउट टाकने स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे टाळत आहेत याच्या पाठीमागे काय गोडबंगाल आहे हे जनतेसमोर आलेले नाही...!शिवाय बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मार्च २०२० मध्ये दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावयास हे दोन्ही अधिकारी का तयार नाहीत? याचीसुद्धा बीडच्या पालकमंत्र्यांवर शहानिशा करावयाची वेळ आलेली आहे. यावर बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून प्रकल्प संचालक व बीडचे गटविकास अधिकारी यांना समज देण्याची वेळ आलेली आहे.आणि तात्काळ रमाई आवास योजेनेअंतर्गत मंजूर झालेले सर्व घरकुल अॉनलाईन नोंदणी करून लाभार्थ्यांना मार्कआऊट टाकून दिले तर लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा होईल..

No comments