Breaking News

खबरदार ! संचार बंदीचा आदेश मोडाल तर...

केजमध्ये संचारबंदीची पायमल्ली करणाऱ्या दहा टपरी चालकसह हॉटेल मालकावर गुन्हे दाखल
प्रतिकात्मक

गौतम बचुटे । केज 
संचार बंदी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग करणाऱ्या केज मधील टपरीचालक आणि हॉटेल चालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

केज येथे दि.२ जुलै रोजी सायं. ४:०० ते ६:०० वाजन्याचे सुमारास केज-बीड आणि केज-अंबाजोगाई रोडलगत टपरी चालक व हॉटेल व्यावसायिकांनी शहरात संचारबंदी लागु असतांना पान टपरी उघडी ठेवुन पान मसाला, फराळ आणि चहा विक्री करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्या नुसार पोलिसांनी लक्ष्मीकांत दिनकर गवळी, मोसीन मुस्ताक तांबोळी, शेख खलील हुसेन, हरीभाउ खेलबा रोडे, बाबासाहेब लक्ष्मण कदम वय, सज्जाद खमरोद्दीन इनामदार, शेख माजेद शबीर, पठाण मोजम मुकरम खान, शेख अमीर शेख गफूर आणि शेख फारूक शेख मुनीर यांच्यावर कार्यवाही केली आहे. त्या सर्वांवर गु.र.नं. २५३/२०२०  भा.द.वी. १८८, २७९, २७० सह कलम १७ महाराष्ट्र पोलीस अधिनीयम सह कलम कलम ५१ (ब) आपत्ती व्यवस्थापण अधिनीयम २००५ तसेच कलम ११ महाराष्ट्र कोव्हीड-१९ विनीमयन २०२० कार्यवाही केली. तसेच आपल्यामुळे संसर्ग पसरण्याचा संभव होऊ शकतो हे माहीत असताना संचारबंदी आदेश तसेच जिल्हा कार्यकारी समितीने दिलेल्या आदेशाचे अनुपालन केले नाही; म्हणून पोलीस नाईक मंगेश भोले यांच्या फिर्यादी नुसार गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या आदेशा नुसार  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव गुजर हे पुढील तपास करीत आहेत. पोलीसांच्या या कार्यवाहीमुळे अनेकांचे धाबे दणाणले असून नियमांचे उल्लंघन केले तर आता खैर नाही.

No comments