Breaking News

ऑडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन : रिलायन्स फाउंडेशनचा उपक्रम


बीड : जिल्ह्यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर इत्यादी मुख्य पिकांच्या पेरण्या बऱ्यापैकी झाल्या आहेत. आता पीक उगवून आले आहे आणि आता शेतकऱ्यांना खते, अन्नद्रव्ये, तणव्यवस्थापन करण्याची गरज आहे. त्यामुळे या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र खामगाव व रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने डिजिटल टेकनोलॉजि चा वापर करून डायल आऊट कॉन्फरन्स चे आयोजन करण्यात आले होते.
आता पिकाला खतांच्या मात्रा, तण नियंत्रण तसेच पिक उगवाल्यांनातर पिकाला लागणारे खते, अन्नद्रव्य तसेच कीड नियंत्रण याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमामध्ये डॉ. बी.बी. गायकवाड (कृषी विज्ञान केंद्र खामगाव) यांनी कापूस पिकासाठी खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापन इत्यादी विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच खरीप पिकांच्या संदर्भात कपासी साठी नत्र, स्फुरद, पालाश हे डोस कशे द्यावे, कीड व रोग व्यवस्थापन कसे करावे,   निंबोळी अर्काचा वापर ह्याविषयी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये बीड जिल्ह्यातील सुमारे 35 शेतकरी एकाच वेळी फोनद्वारे जोडले गेले होते. तज्ज्ञांनी शेतकऱ्यांचा समस्यांचे निराकरण केले. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन रिलायन्स फाउंडेशन चे जिल्हा व्यवस्थापक मनोज काळे यांनी केले व विजय खंडागळे यांनी सहकार्य केले.

No comments