Breaking News

मेटे साहेबांचा पाठपुरावा,अजित दादाचा निर्णय सारथीला तारणारा:-राजेंद्र आमटे

सरकारच्या निर्णयाचे फटाके वाजून स्वागत

बीड :  मा.आ.विनायकराव मेटे यांनी सतत पाठपुरावा करून सारथी संस्थेचा प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे काम केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी सारथी ची बैठक घेत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लवकरच जमा करण्यात येईल सारथी संस्था ही महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागामार्फत चालवण्यात येईल असा निर्णय घेतल्यानं या निर्णयाचे विद्यार्थी यांच्यातून स्वागत करण्यात येत असून बीडमध्ये शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीच्या वतीने फटाके वाजून स्वागत करण्यात आले.

मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील विध्यार्थी साठी यु.पी.एस.सी व एम.पी.एस.सी सारख्या स्पर्धा परीक्षा च्या तयारी करीत बार्टी च्या प्रमाणे सारथी ही संस्था सरकार स्थापन केले पण सरकाने या कडे लक्ष दिले नाही या संस्था फॅक्त नावापूर्तीच उरली होती विध्यार्थी च्या शिष्यवृत्ती रखडल्या होत्या अनेक साधने उपलब्ध नव्हते सारथी बंद पडेल असे वाटत असताना मा.आ.विनायकराव मेटे साहेब यांनी सतत पाठपुरावा करून सारथी संस्थेचा प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे काम केले . मा. ना. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी सारथी ची बैठक बोलवून धडक निर्णय घेत सर्व विध्यार्थीच्या शिष्यवृत्ती लवकरच जमा करण्यात येतील ,तसेच सारथी संस्था ही महाराष्ट्र शासनाचे नियोजन विभागामार्फत चालवण्यात येईल असे असे धडाडीचे निर्णय घेण्यात आले. या सर्व निर्णयाचे विध्यार्थी मध्ये स्वागत करण्यात येत आहे.आ.मेटे साहेबांचा पाठपुरावा व अजित दादा पवार यांच्या धडक निर्णयाने सारथीला चांगले दिवस येतील असा विश्वास विध्यार्थी मध्ये आहे. शासनाच्या निर्णयाचे शिवसंग्राम विध्यार्थी आघाडीच्या  सोसिल डिस्टन्स पळून  जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे, प्रदीप आमटे ,अमोल आमटे,सचिन आमटे,डिंगबर शिंदे,जगदीश सपकाळ,दिनकर करपे,दिगंबर सपकाळ, भाऊसाहेब राऊत ,जनाधन अवघड,सुरेश झणझने,गौतम ठोकळ,काशिनाथ वाघमारे, फटाके वाजून  स्वागत करण्यात आले.

No comments